Thursday, June 13, 2024

TMKOC | दिशा वकानीच्या घरात चिमुकल्या पावलांचं आगमन, दुसऱ्यांदा आई बनली ‘दयाबेन’

तारक मेहता का उल्टा चष्मा‘मध्ये (TMKOC) दयाबेनची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली दिशा वकानी (Disha Vakani) पुन्हा एकदा आई झाली आहे. होय, दिशा वकानीच्या घरात चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. दुसऱ्यांदा आई झालेल्या दिशाने एका मुलाला जन्म दिला आहे. या वृत्ताला खुद्द तिचा भाऊ मयूर वकानी (Mayur Vakani) याने दुजोरा दिला आहे. मामा झालेल्या मयूर वकानी याच्याही आनंदाला पारावार उरला नसून, यावेळी संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

काय म्हणाला मयूर वकानी?
या शोमध्ये मयूर वकानी सुंदरलालच्या भूमिकेत दिसत असून, त्याला या व्यक्तिरेखेमध्ये खूप पसंत केले जाते. शोमध्ये दयाबेनच्या भावाची भूमिका साकारत असतानाच, तो खऱ्या आयुष्यातही दिशा वकानीचा भाऊ आहे. आता तो दुसऱ्यांदा मामा बनल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. वृत्त वाहिनीशी संवाद साधताना मयूर वकानीने सांगितले की, तो मामा झाल्यानंतर किती आनंदी आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, “दिशाने २०१७ मध्ये एका मुलीला जन्म दिला होता आणि आता ती पुन्हा एकदा आई झाली आहे. ज्यामुळे मला खूप आनंद झालाय.” (taarak mehta ka ooltah chashmah fame disha vakani blessed with baby boy)

दिशा वकानी शोमध्ये परतणार का?
नुकतेच, शोचे निर्माते असित मोदी यांनी एका मुलाखतीत पुष्टी केली होती, की दयाबेनचे पात्र यावर्षी शोमध्ये परत येईल. त्याचवेळी या भूमिकेत दिशा वकानीच्या उपस्थितीबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी दिशा वकानीची जागा घेतली जाऊ शकते, असा इशारा दिला. आता दिशा आई झाल्याची बातमी आली असून, ती सध्या शोमध्ये परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत शोमध्ये तिची जागा दुसरे कोणीतरी घेणार हे निश्चित आहे.

साल २०१७ मध्ये दिशा वकानीने एका मुलीला जन्म दिला आणि तेव्हापासून ती मॅटर्निटी ब्रेकवर आहे. पाच वर्षांपासून प्रेक्षक तिची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा