टेलिव्हिजन विश्वातला सर्वात जास्त चालणारा शो म्हणून ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. ही मालिका १३ वर्षांपासून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने लहानापासून ते मोठ्यांपर्यत सर्वच कलाकरांना संपूर्ण जगात ओळख मिळवून दिली. या मालिकेतील सर्वच भूमिका प्रेक्षकांना त्यांच्या घरातल्या वाटत असतात. जेठालाल, दया, भिडे, बबिता आदी सर्वच भूमिकांनी लोकांचा मनात एक विशेष जागा बनवली आहे. या मालिकेतील अशीच दोन पात्रे म्हणजे दया आणि तिचा वीरा सुंदर.
या अतिशय हटके आणि विचित्र भावाबहिणीच्या जोडीने रसिकांना त्याच्या हरकतींवरून खळखळून हसवले. आपल्या जिजाकडून सतत या ना त्या कारणाने पैसे उकळणारा, वेगवेगळा उद्योग सुरु करून जिजाला त्यात पैसे गुंतवण्यास भाग पाडणारा हा साला, जेव्हा जेव्हा मालिकेत दिसला तेव्हा तेव्हा तो खूप भाव खाऊन गेला. रील आणि रियल दोन्ही जीवनात बहीण भाऊ असणारे हे दोघं म्हणजे दिशा वकानी आणि मयूर वकानी आहे. जेव्हापासून दिशा वकानीने या मालिकेतून काही काळापुरता ब्रेक घेतला आहे, तेव्हापासून सुंदर म्हणजेच मयूर देखील या मालिकेत जास्त दिसत नाही.
शो सुरु झाल्यापासून बहीण भावाची भूमिका करणाऱ्या या दोघांना पहिल्यापासूनच प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. यांच्यातले प्रेम, बॉण्डिंग नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेचा आणि आवडीचा विषय बनले. मात्र दिशाने ब्रेक घेतला आणि मयूर देखील मालिकेतून जणू गायबच झाला आहे. त्यामुळेच कदाचित मयूरने देखील बहिणीप्रमाणे मालिकेतून ब्रेक घेतला की काय अशा चर्चा अलीकडे रंगत आहेत.
मात्र याला कारण दयाबेन अर्थात दिशा वकानीच आहे. कारण असे आहे की, मयूरचे बहुतेक करून सर्व सीन किंवा नवीन कथा ही दयाबेन आणि सुंदरलाल यांच्याभोवतीच फिरताना दिसते. आता मालिकेत दया नसल्याने सुंदर देखील यात दिसण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. काही भाग वगळता सुंदर मालिकेत दिसत नाही. जेव्हा दयाबेनची शोमध्ये वापसी होईल तेव्हाच सुंदर देखील मालिकेत पुन्हा दिसण्यास सुरुवात होईल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-