Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम निधी भानुशालीचे फोटो व्हायरल; बोल्ड फोटोशूटने वाढवला इंटरनेटचा पारा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध शोच्या बाल कलाकारांनी अभिनयाच्या जोरावर अनेक प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांनी या बालकलाकारांना लहानापासून मोठी झालेली पाहिली आहेत. अभिनेत्री निधी भानुशाली, म्हणजेच जुनी ‘सोनू’ प्रेक्षकांना खूप आवडते. अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अभिनेत्री निधी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करते. नुकताच निधीचा एक फोटो सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे.

नुकताच केलेल्या बोल्ड फोटोशूटमध्ये निधीचा लूक ग्लॅमरस दिसत आहे. निधी या फोटोत अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. तिचा हा फोटो ब्लॅक ऍंड व्हाईट आहे, जो तिच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. निधीने या फोटोत काळ्या रंगाची बिकिनी घातलेली दिसत आहे. तसेच, तिने नाकात नोज रिंग घातली आहे आणि तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. तिची स्टाईल एकदम वाईल्ड दिसत आहे. तसेच, निधी हिप्पी आणि जिप्सी स्टाईलमध्ये दिसत असते. यावेळीही निधीचा लूक प्रचंड सुंदर दिसत आहे.

निधीचे फोटो पाहिल्यानंतर तिचे चाहते खूप कौतुक करत आहेत. नेहमीप्रमाणेच, निधीची बोल्ड स्टाईल चाहत्यांना घायाळ करत आहे. निधी खर्‍या जीवनात खूप बोल्ड आहे. ती तिचे बोल्ड फोटोशूट पोस्ट करताना मागेपुढे पाहत नाही. ती तिच्या स्टाईलने सर्वांना वेड लावते. आजकाल निधी सुट्टीवर असल्याने, सुट्टीचा आनंद लुटत आहे.

दरम्यान, यापुर्वीही निधीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी निधीचा एक बिकिनी व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये ती जंगलाच्या मध्यभागी असलेल्या तलावात अंघोळ करताना दिसत होती. यानंतरही तिने समुद्र किनाऱ्यावरील एक व्हिडिओ शेअर केला होता. याआधीही तिचे बिकिनी व्हिडिओ खूप व्हायरल झाले आहेत. निधीचे अनेक चाहते तिला एक यूट्यूब चॅनेल उघडण्याची विनंती करत आहेत, जेणेकरून ते तिचे व्हिडिओ रोज पाहू शकतील. निधी बऱ्याच काळापासून नवीन नवीन ठिकाणी फिरताना दिसत आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये आत्माराम भिडे यांची मुलगी सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी होती. सोनूही टप्पूसेनातील सर्वात हुशार सदस्य आहे. आता सोनूची भुमिका पलक सिधवानी साकारत आहे. निधी आणि पलक यांच्या आधी झील मेहताने हे पात्र साकारले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यनंतर एजाज खानने मागितली माफी; म्हणाला, ‘जर मी तुझ्याशी…’

-सिद्धार्थ शुक्ला मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांनी नोंदवला एडीआर, डॉक्टरांनी ‘या’ मृत्यूची वर्तवली शक्यता

-कधी ओपन शर्ट, तर कधी जंगलात बिकीनी घालून पोझ देतेय अदाकारा; वेड लावतोय मौनीचा हा कातीलाना अंदाज

हे देखील वाचा