‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही लोकप्रिय मालिका आहे. पण सध्या ही मालिका जोरदार चर्चेत आली आहे. त्याच कारण अस की ह्या मालिकेत एकापाठोपाठ एक कलाकार ही मालिका सोडून जात आहे. सुरुवातीला ह्या मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी या अभिनेत्रीने ही मालिका सोडली. त्यानंतर शैलेश लोढा म्हणजेच या मालिकेतील तारक मेहता यांनीही ही मालिका सोडली आहे. पण ही मालिका सोडण्याचे कारण नेमके काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असतानाच, तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वीच निर्माते असित कुमार मोदी यांच्याबाबतीत मोठा खुलासा केला होता. आणि ही मालिका सोडण्याचे कारण सांगितले होते. पण हे शाब्दिक युद्ध संपता संपेना. शैलेश लोढा यांनी एक सोशल मिडिया पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे चर्चेला उधान आले आहे. चला तर बघूया नेमके काय लिहिले आहे या पोस्टमध्ये?
गेल्या वर्षी तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता की, शोच्या निर्मात्यांनी अद्याप त्यांच्या कामाचे पैसे दिले नाही. यानंतर निर्माता असित मोदी आणि जुने तारक मेहता यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले.
शैलेश लोढा यांनी नुकताच स्वत:चा एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्यात काय खास आहे? तर या फोटोमध्ये नाही तर त्याच्या कॅप्शन खास आहे. ज्यामध्ये ते उघडपणे कोणाला तरी आव्हान देताना दिसत आहे. हा सगळा इशारा मालिकेचे निर्माते असित मोदीं यांच्याकडे जात आहे. असा अंदाज चाहते लावत आहे.
त्यांनी स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिले की, दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, ये एक चिराग, कई आँधियों पर भारी है….वसीम साहब का ये शेर बिलकुल मुफीद है, क्यों कि “अब जंग तो होगी”…. म्हणजेच प्रार्थना करा की, माझी हिम्मत कायम राहील, एक दिवा, अनेक संकटावर मात करू शकतो. आता युद्ध तर होईल. अप्रत्यक्ष रित्या हा इशारा निर्माते असित मोदी यांच्याकडे जात आहे असे चाहते म्हणत आहे.
View this post on Instagram
अलीकडेच एका कार्यक्रमात त्यांनी गेलेल्या शैलेश लोढा यांची वेदना जेव्हा त्यांना शो सोडण्याचे कारण काय असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा पुन्हा एकदा शोच्या निर्मात्यांना लक्ष्य केले आणि म्हटले की, ‘कोणताही निर्माता अभिनेत्यापेक्षा मोठा असू शकत नाही, तो एक व्यावसायिक आहे. ‘जेव्हा एखादा उद्योगपती एखाद्या कवीवर, अभिनेत्यावर वर्चस्व गाजवेल तेव्हा ज्वालामुखी फुटेल.’ याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झाली. (taarak-mehta-ka-ooltah-chashmah-fem-tarak-mehata-shailesh-lodha-social-media-post-viral)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम शैलेश लोढांनी सांगितलं सीरियल सोडण्यामागील खरं कारण, म्हणाले…
काम मिळवण्यासाठी ‘गंगुबाई काठियावाडी’ फेम ‘या’ अभिनेत्रीचा 40 वर्षे संघर्ष, सावळा रंग ठरले कारण