Friday, January 3, 2025
Home अन्य धक्कादायक! तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘गोगी’ला जीवे मारण्याची धमकी; तक्रार केली दाखल

धक्कादायक! तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘गोगी’ला जीवे मारण्याची धमकी; तक्रार केली दाखल

सब टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाहला जीवे मारण्याची धमकी मिळाली. ही धमकी मिळाल्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. ही घटना मंगळवारी (२७ ऑक्टोबर) बोरिवली येथील समय शाहच्या बिल्डींगजवळ घडली. त्याला धमकावण्याची ही तिसरी वेळ होती.

काही व्यक्तींनी समय शाहसोबत गैरवर्तन केले आणि त्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु आतापर्यंत त्या मुलांची ओळख पटलेली नाही. बिल्डींगची सीसीटीव्ही फुटेज मिळाली आहे. याच्याच आधारे पोलीस तपास करत आहेत.

समय शाहने बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर सीसीटीव्ही फुटेजचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक व्यक्ती दिसत आहे. यासोबतच समयने त्याच्यासोबत घडलेली पूर्ण घटना सांगितली.

समय शाहने लिहिले की, “दोन दिवसांपूर्वी हा व्यक्ती माझ्या बिल्डींगमध्ये आला आणि विनाकारण मला शिव्या देऊ लागला. मला माहिती नाही की तो कोण आहे. मला शिव्या देण्यामागील त्याचे कारण काय आहे? त्याने मला धमकी दिली की तो मला मारेल. जे लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यासोबत मी ही माहिती शेअर करत आहे. मला वाटते की, जर काही घडले, तर हे माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी योग्य राहील. धन्यवाद.”

समय शाहने एका वेबसाईटशी चर्चा करताना म्हटले की, “जेव्हा मी शूटिंगवरून मी माझ्या बिल्डींगमध्ये परतलो होतो, तेव्हा रात्री जवळपास ८.३० वाजल्या होत्या. एका व्यक्ती अचानक माझ्याजवळ आला आणि विनाकारण तो मला शिव्या देऊ लागला. त्या घटनेपासून मी खूप चिंतेत आहे.”

समय शाहच्या आईने सांगितले की, “त्याच्यासोबत असे घडण्याची १५ दिवसातील ही तिसरी वेळ आहे.”

वाचा-

-‘तुम्हाला स्वत:ला लाज वाटली पाहिजे’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर कंगनाची आगपाखड

-बिग बॉसचा माजी कंटेस्टेंट हिंदुस्तानी भाऊच्या आईचं निधन; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा