Tuesday, July 9, 2024

‘दयाबेन’पासून, ‘जेठालाल’च्या ‘बबिता जी’पर्यंत ‘तारक मेहता…’ मधील कलाकारांची खरी नावे घ्या जाणून

टेलिव्हिजनवर अनेक कॉमेडी शोजने दर्शकांच मनोरंजन केलं आहे. परंतु त्यातील असे काही निवडक शो आहेत ज्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. त्यापैकी एक म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. सब टीव्हीवरील ‘तारका मेहता का उलटा चष्मा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय झाला. परंतु बऱ्याच लोकांना यांची खरी नावं माहिती नसतील. चला तर जाणून घेऊयात या सुपरहिट कलाकारांची खरी नावं.

शोमध्ये मुख्य भूमिका निभावणारी दया जेठालाल गडा हीच खरं नाव ‘दिशा वकानी’ हे आहे. दिशाने आपल्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीची सुरवात ‘जोधा अकबर’ या चित्रपटापासून केली. तिने महाराणी जोधाच्या दाशीची भूमिका निभावली होती. आणि आता ती दयाबेन म्हणून तारक मेहतामध्ये काम करत आहे. आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

चला तर आता जाऊयात दुसऱ्या पात्राकडे, जे ह्या मालिकेची जान आहेत, ते म्हणजे जेठालाल गडा. त्यांच्या कॉमेडी स्टाईलने सगळ्यांची मन जिंकून घेतली आहेत. या मालिकेत जेठालालची भूमिका पार पाडणाऱ्या अभिनेत्याचं नाव ‘दिलीप जोशी’ हे आहे. या मालिकेत येण्याआधी दिलीप यांनी अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत.

या मालिकेत ‘जेठालाल गडा’ चे वडील ‘चंपकलाल गडा’ यांचं खर नाव ‘अमित भट’हे आहे. याआधी ते 2006 पासून ते 2015 पर्यंत ‘एफआयआर’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांसमोर आले होते.

या मालिकेत ‘बबिता अय्यर’ ही देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तिचे खरं नाव ‘मुनमुन दत्ता’हे आहे. या मालिकेमध्ये यायच्या आधी मुनमुन अनेक मालिका आणि चित्रपटात दिसली होती.

या मालिकेतील तारक मेहता यांना तर तुम्ही ओळखतच असाल, ‘शैलेश लोंढा’ हे तारक मेहता यांचे खरं नाव आहे. शैलेश हे उत्कृष्ट कॉमेडियन तर आहेतच पण त्याचबरोबर ते एक चांगले कवी आणि लेखक देखील आहेत. तारक मेहता या मालिकेमध्ये येण्याच्या आधी देखील त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. परंतु त्यांनी जास्त काम हे कॉमेडी मालिकांमध्ये केले आहे.

https://www.instagram.com/p/B6w8X-TBgXm/?utm_source=ig_web_copy_link

तारक मेहता यांची पत्नी अंजली मेहता हीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं खरं नाव ‘नेहा मेहता’ हे आहे. गुजरातमध्ये राहणाऱ्या नेहाने या आधीही अनेक कॉमेडी शोमध्ये काम केले आहे.

https://www.instagram.com/p/CJeQCI1JJT1/?utm_source=ig_web_copy_link

तारक मेहतामध्ये गोली हाथी यांचं पात्र निभावणाऱ्या युवा कलाकाराचं खरं नाव ‘समय शहा’ हे आहे. तसेच या मालिकेत भिडे मास्टरचं पात्र निभावणाऱ्या कलाकारचं नाव ‘मंदार चंदवादकर’ हे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! तारक मेहता का उल्टा चष्माच्या ‘गोगी’ला जीवे मारण्याची धमकी; तक्रार केली दाखल

‘तारक मेहता का उलटा चष्मा’मध्ये येणार नवी ‘दया बेन’; सुंदरता पाहून तुम्हीही म्हणाल, अप्रतिम!

आय लव्ह यू! अखेर जेठालालने दिली प्रेमाची कबूली, बबितासमोर व्यक्त केली प्रेमभावना

हे देखील वाचा