Saturday, August 2, 2025
Home टेलिव्हिजन ‘तारक मेहता’मध्ये येण्याआधी मोठ्या संघर्षात गेले अभिनेत्री पलक सिंधवानीचे जीवन

‘तारक मेहता’मध्ये येण्याआधी मोठ्या संघर्षात गेले अभिनेत्री पलक सिंधवानीचे जीवन

टीव्ही इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेने सर्वानाच वेड लावले असून, प्रत्येकाच्या टेन्सिववरील उत्तम उपाय म्हणून ही मालिका ओळखली जाते. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आज ही मालिका लोकप्रियेतच्या शिखरवर असून, मालिकेतील कलाकार देखील अमाप लोकप्रिय आहेत. याच मालिकेत अभिनय करणारी सोनू भिडे अर्थात अभिनेत्री पलक सिंधवानी. पलकला या मालिकेमुळे अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. मात्र तुम्हाला माहित आहे का की या मालिकेआधी पलक नक्की काय करायची? चला जाणून घेऊया.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

पलकसाठी तिचा अभिनयच प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. तिने ‘तारक मेहता’ मालिकेत येण्याआधी खूप मोठा संघर्ष केला आहे. अभिनेत्री निधी भानूशालीला रिप्लेस करून पलक या मालिकेत आली. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, रुपया वच्वब्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. ती म्हणाली, “मी पेयिंग गेस्ट म्हणुन राहायची. मुंबईमध्ये मी खूप घरं बदलली. मुंबईमध्ये राहताना २००० रुपयर वाचवण्यासाठी मी घर बदलावयची. मग शेवटी आम्ही 1 बीएचके, नंतर 2 बीएचके आणि मग 3 बीएचके अपार्टमेंट मध्ये शिफ्ट झालो. मात्र आता मला स्वतःचे घर घ्यायचे आहे, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”

पलक सिंधवानीने हे देखील सांगितले की, जेव्हा ते 1 बीएचके फ्लॅटमध्ये राहायचे तेव्हा त्यांच्या घरत कोणत्याही सोयी नव्हत्या. घरात बसायला सोफा देखील नव्हता. ती म्हणाली, “मी जेव्हा तारक मेहता जॉईन केले. त्यानंतर मी आणि माझ्या भावाने मिळून यूट्यूब चॅनल काढायचे ठरवले. मात्र आमच्याकडे चांगले घर नव्हते. आमचे घर आम्ही कॅमेऱ्यामध्ये दाखवू शकत नव्हतो. लॉकडाऊन लागल्यानंतर मी आणि भावाने मिळून १५००० रुपयांमध्ये घरात काही सामान आणायचे ठरवले.” त्यानंतर पलकने घरात काऊच, लॅम्प आणि पेंटिंग आणल्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नाद कार पण…! शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई
अथिया शेट्टीचा नमस्कार करताना दिसला अहान शेट्टी, फोटो पोस्ट करत म्हणाला…

हे देखील वाचा