मनोरंजनासाठी प्रेक्षकांच्या सर्वात जवळचे साधन म्हणजे टीव्ही. टीव्ही म्हटले की, लगेच डोळ्यासमोर येतात त्या टीव्हीवरील रटाळ मालिका. तेच तेच विषय घेऊन त्यात किंचित बदल करून, चॅनेल नवीन नावाने मालिका जगासमोर आणतात. टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर आजपर्यंत अनेक मालिका आल्या आणि गेल्या, मात्र अशा काही मोजक्याच मालिका होत्या ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर लोकप्रियतेचे आणि प्रसिद्धीचे गारुड घातले. यातलीच एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’. मागील १३ पेक्षा अधिक वर्षांपासून प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारी ही मालिका आज इतक्या वर्षांनंतर लोकप्रियतेच्याबाबतीत आघाडीवर आहे. या मालिकेने मालिकेत काम करणाऱ्या लहानापासून मोठ्यांपर्यत सर्वानाच संपूर्ण जगात एक ओळख मिळवून दिली.
याच मालिकेतील सर्वात लोकप्रिय भूमिका म्हणजे ‘दयाबेन’. दयाबेन ही भूमिका या शोची सर्वात महत्वाची आणि विशेष लोकप्रिय भूमिका आहे. दयाबेन अर्थात दिशा वकानी मागच्या काही वर्षांपासून या शोमधून गायब आहे. मातृत्वाच्या रजेवर असणारी दिशा पुन्हा मालिकेत परतणार असल्याच्या अनेक चर्चा काही महिन्यांपासून रंगत आहे. सोशल मीडियावर बऱ्याचदा याबद्दल अनेक अफवा देखील पसरवल्या जातात. मात्र अजून याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती कोणाकडेच नाहीये.
यासर्वांमधेच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगला व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये देखील एक दयाबेन दाखवली गेली आहे. ही दयाबेन देखील सर्वाना भरपूर आवडत आहे. या व्हिडिओमध्ये खऱ्या दयाबेनची तंतोतंत कॉपी करण्यात आली आहे. गरिमा गोयल या यूट्यूबरने हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अगदी थोड्याच वेळात ही हटके दयाबेन चांगलीच प्रसिद्ध झाली.
या व्हिडिओमध्ये गरिमा २४ तासांसाठी दयाबेन बनली आहे. तिने साडीपासून अंबाड्यापर्यंत अगदी दयाबेनसारखेच रूप घेतले आहे. सोबतच तिने दयाबेनचा अंदाज देखील कॉपी केला आहे. गरबा, टप्पू के पापा म्हणायची स्टाइल आदी जवळपास सर्वच कॉपी केले आहे. शिवाय गरिमा या व्हिडिओमध्ये खऱ्या दयाबेनचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय संवाद देखील म्हणतात दिसत आहे. ही २४ तासांसाठी बनलेली नवीन दयाबेन सोशल मीडियावर धूम करत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी चॅनेल, दिग्दर्शक, निर्माता यांना गरीमालाच नवीन दयाबेन म्हणून घेण्याची सल्ला वजा विनंती केली आहे.
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेत दया ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ पासून तिच्या मॅटर्निटी रजेवर आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून दिशा परतणार असल्याच्या अनेक चर्चा रंगत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नाशकात पोलिसांकडून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश! मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह २२ जणांना अटक