Sunday, June 8, 2025
Home अन्य ‘बबिता जीं’चा पहिला पगार होता फक्त ‘एवढे’ रुपये; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

‘बबिता जीं’चा पहिला पगार होता फक्त ‘एवढे’ रुपये; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

कलाकारांचा सुरुवातीच्या काळातील प्रवास हा फार खडतर असतो. आपल्या कलेला वाव मिळावा, आपल्या अंगामध्ये जी कला आहे ती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी ते खूप धडपड करत असतात. अशात काहींना काम मिळते, परंतु सुरुवातीला त्यांना कोणी ओळखत नसल्याने खूप कमी मानधन दिले जाते. त्यामुळे कमी मानधनामध्ये देखील त्यांना आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय द्यावा लागतो. अशात काहींची परिस्थिती हलाखीची असल्याने ते अभिनयाकडे पाठ फिरवतात. मात्र, काही कलाकार यावर मात करतात. असेच काहीसे छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीसोबतही घडले होते. कमी पैशांमध्ये मुनमुन दत्ताला काम करावे लागले होते.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील बबिता जी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि हॉट लूकने जेठालाललाच नाही, तर अनेक चाहत्यांना घायाळ करते. तिचे सोशल मीडियावर 55 लाखांपेक्षाही अधिक चाहते आहेत. तिच्या प्रत्येक नवीन फोटोची आणि व्हिडिओची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. टप्पूबरोबर सुरू असलेल्या तिच्या प्रेमकहाणीने नेटकऱ्यांना मिम्ससाठी चांगलाच विषय भेटला आहे.

अवघ्या १५० रुपयांपेक्षाही कमी होते पहिले मानधन
अभिनेत्रीने गेल्या १३ वर्षांपासून बबिता जीच्या भूमिकेमधून यशाचे शिखर गाठले आहे. तिने फक्त सहा वर्षांच्या वयात अभिनयाला सुरुवात केली होती. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने या गोष्टीचा खुलासा केला होता. मुनमुन म्हणाली होती की, “मी सहा वर्षांची असताना पहिली भूमिका केली, तेव्हा फक्त १२५ रुपये पगार मिळाला होता.” सध्या मुनमुन मालिकेच्या प्रत्येक एपिसोड साठी ५०,००० रुपये मानधन घेते. तसेच ती १५ कोटींच्या संपत्तीची मालकीण देखील आहे. साल २००५ मध्ये तिने अभिनयाला सुरुवात केली होती.

टीव्ही मालिकांमध्ये यशाचे शिखर गाठलेल्या या अभिनेत्रीने सुरुवातीला मॉडेलिंगपासून सुरुवात केली. मॉडलिंगमध्ये तिला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे ती पुण्याहून मुंबईला रवाना झाली. त्यांनतर तिला ‘हम सब बाराती’ या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. काही दिवसांपूर्वी एका वादग्रस्त विधानावरून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये दिसत नव्हती. परंतु तिने आता या मालिकेमध्ये पुनरागमन केले आहे. तसेच आल्यापासून तिचे नाव राज अनादकट बरोबर जोडले जात आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ

-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?

हे देखील वाचा