Sunday, July 14, 2024

बरेच प्रयत्न करूनही तैमूरला मिळाली नाही आइस्क्रीम; सैफ-करीनाही करू शकले नाही काहीच!

बॉलिवूड स्टार कपल सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांचा मुलगा तैमूरची (Taimur Ali Khan) चर्चा सतत माध्यमांमध्ये असते. त्याची आई करीना कपूर देखील अनेकदा आपल्या मुलाचे गोंडस फोटो-व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. अशातच, सध्या तैमूर खानचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये तो आईस्क्रीम मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. पण तरीही त्याला आईस्क्रीम मिळत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचे पालकही या प्रकरणात काहीच करू शकत नाहीयेत.

तुर्की आईस्क्रीम विक्रेत्याने थकवले तैमूरला
तैमूरचा हा व्हिडिओ तुर्कीच्या एका आईस्क्रीम विक्रेत्यासोबतचा आहे. या व्हिडिओमध्ये, तैमूर या आईस्क्रीम विक्रेत्याकडून आईस्क्रीम घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, परंतु विक्रेता आपल्या स्मार्टनेस आणि आश्चर्यकारक कौशल्याने आईस्क्रीमला स्पर्शही करू देत नाही. तैमूर आईस्क्रीम कोन पकडायचा आणि नंतर तो रिकामा पाहून दुःखी व्हायचा. मग विक्रेता त्याला आईस्क्रीमचा मोठा तुकडा दाखवतो, पण देत नाही.  दरम्यान, तो तैमूरच्या पोटाला कोनने गुदगुल्याही करतो.

फॅन क्लबने शेअर केला व्हिडिओ
हा व्हिडिओ एका मॉलमधील आहे, पण त्याचे लोकेशन समजू शकले नाही. हा व्हिडिओ तैमूर अली खानच्या फॅन क्लब पेजने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. छोट्या नवाबचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.

या आधीही तैमूरचे अनेक फोटो-व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पॅपराझींना आपली ऍटिट्यूड दाखवायलाही तो मागे हटत नाही. कधी ते रागावतो, तर कधी प्रेमाने नमस्कार करताना दिसतो.

हेही वाचा-

हे देखील वाचा