कलाकार त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असतात. कलाकारांचे विवाह, त्यांची मुलं, त्यांचे पेहराव अशा सर्व गोष्टींची माहिती ठेवणे प्रत्येक चाहत्याला आवडते. आपल्या आवडीच्या कलाकारांबरोबरच त्याच्या आयुष्यातील खास गोष्टींचे अपडेट प्रत्येक चाहत्याकडे असतात.
अशात अभिनयक्षेत्रात आपल्या अभिनयाने सर्वांना घायाळ करणारी करीना कपूर सध्या चांगलीच चर्चेत असते. खरं तर करीनापेक्षा तिच्या दोन मुलांचीच सर्वत्र चर्चा सुरू असते.
नुकतेच करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. तेव्हापासून तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. करीनाची दोन्ही मुलं सोशल मीडियावर धमाल करत असतात. त्यांच्या नवीन फोटोंची आणि व्हिडिओजची चाहते आतुरतेने वाट पाहतात. तिचा मोठा मुलगा तैमूर बऱ्याचदा लाईमलाईटमध्ये असतो. नुकताच त्याचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Taimur did a high jump, video goes viral on social media)
या व्हिडिओमध्ये तो पत्रकारांसमोर मोठी उडी मारून एन्ट्री करतो आणि धावत गाडीजवळ जातो. त्याच्यामागे करीना देखील लगेच येते. दोघेही गाडीमध्ये बसून निघून जातात. हा व्हिडिओ व्हायरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांचे खूप सारे लाईक्स मिळत आहेत. तसेच चाहते या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
कमेंट्स करत असताना एका चाहत्याने असे म्हटले आहे की, “हा भारतासाठी हाय जम्पमध्ये सुवर्णपदक नक्की आणेल.” दुसऱ्या एका चाहत्याने करीनाच्या ऍटिट्यूडबद्दल लिहिले आहे. करीना तैमूरबरोबर बाहेर आली, तेव्हा तिला सर्व पत्रकार आवाज देत होते. परंतु करीनाने त्यांना जास्त प्रतिक्रिया दिली नाही.
करीनाच्या चित्रपट कारकिर्दीविषयी बोलायचे झाले, तर अभिनेत्री नव्वदच्या दशकापासून सिनेसृष्टीत काम करत आहे. सध्या ती आमिर खानबरोबर ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका
-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट
-जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या एका प्रश्नासाठी बिग बींनी मागितली माफी; केली होती ‘ही’ चूक