Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

तमन्ना भाटियाच्या छोट्याशा कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मने, व्हायरल व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

साऊथच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या सौंदर्याची तिच्या चाहत्यांमध्येही मोठी क्रेझ आहे. सध्या तमन्ना भारतीय चित्रपट महोत्सवाचा भाग होण्यासाठी मेलबर्नला गेली आहे. तिथे तमन्नाने असे काही केले की ज्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. आता सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. खरे तर IFFM च्या ओपनिंग नाईटला हजेरी लावण्यासाठी आलेल्या अभिनेत्री तमन्ना हिने परदेशी भूमीवर भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले.

इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न अवॉर्ड्स 2022 च्या उद्घाटनादरम्यान, तमन्नाने प्रथम तिचा बूट काढला आणि नंतर दिपप्रज्वलन करण्यासाठी पुढे सरसावली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कार्यक्रमादरम्यान तापसी पन्नू, अनुराग कश्यप देखील उपस्थित होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आधी तापसीने दिपप्रज्वलन केले लावला त्यानंतर तमन्नाला दिपप्रज्वलन करण्याची विनंती करण्यात आली. तमन्नाने तिचा बूट काढला आणि मग ती दिपप्रज्वलन करायला पुढे सरसावली. तमन्नाला हे करताना पाहून जवळ उभ्या असलेल्या एका महिलेने तिचे कौतुक केले, तेव्हा तमन्ना म्हणाली की ही दक्षिण भारतीय परंपरा आहे.

एका चाहत्याने व्हिडिओवर लिहिले, ‘संस्कृतीचा आदर करा.’ दुसर्‍या यूजरने कमेंट केली की, ‘दाक्षिणात्य संस्कृतीने  त्यांना हेच शिकवले आहे. छोट्या गोष्टी महत्त्वाच्या. आणखी एका युजरने लिहिले की, ‘ती भारताच्या संस्कृतीचे आणि समृद्ध वारशाचे प्रतिनिधित्व करत आहे, देवाचा आशीर्वाद तुमच्यावर असो.’ इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर तमन्नाच्या फॅन क्लबने आपल्या हँडलवर या कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर भारतीय संस्कृतीशी निगडीत असल्याच्या या भावनेसाठी चाहते अभिनेत्रीवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

 

तमन्ना हिरव्या आणि काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये पुरस्कारासाठी पोहोचली. या बोल्ड ड्रेसमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत होती. यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप देखील मंचावर उपस्थित होते. तमन्ना चाहत्यांची वाहवा लुटत असताना तापसीला तिची चप्पल घालून दिपप्रज्वलन केल्यामुळे अनेक ट्रोलचा सामना करावा लागला. दरम्यान, तमन्ना लवकरच मधुर भांडारकरच्या आगामी चित्रपट बबली बाउन्सरमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा –

स्पर्धकापेक्षा त्याच्या गर्लफ्रेंडचीच जास्त चर्चा, बिग बी ही झाले आश्चर्यचकित

फक्त लालसिंग चड्ढाचं नव्हे, आमिर खानचे ‘हे’ चित्रपट पाहूनही होईल पश्चाताप

काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर संतापले अनुपम खेर; म्हणाले, ‘गेल्या ३० वर्षांपासून…’

हे देखील वाचा