Sunday, September 8, 2024
Home अन्य तमन्ना भाटियाचा समर लूक प्रेक्षकांना घालतोय भुरळ, सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर

तमन्ना भाटियाचा समर लूक प्रेक्षकांना घालतोय भुरळ, सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर

बॉलीवूडपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. तमन्नाने बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीमध्ये देखील चित्रपटात काम करून आपलं एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. तमन्ना ही चित्रपटा‌‌बरोबरच सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभव ती सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओद्वारे तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिचा समर लुक प्रेक्षकांना दाखवला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने असे कॅप्शन दिले आहे की, “that summer feeling.”

 

तमन्नाचा हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. प्रेक्षकांना देखील तिचा हा लूक खूप आवडला आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला दोन लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच तिचे चाहते देखील यावर जोरदार कमेंट देताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडिओवर केवळ चाहत्यांनी नव्हे, तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील कमेंट दिल्या आहेत. अभिनेत्री श्रुती हसन हिने देखील ‘प्रीटी प्रीटी गर्ल’ अशी कमेंट दिली आहे. तसेच चाहत्यांकडून देखील खूप वेगवेगळ्या कमेंट आलेल्या दिसत आहेत. एका युजरने तिला ‘सुंदर लूक आणि सुंदर स्माईल’ अशी कमेंट केली आहे.तर दुसर्या‌‌ एका युजरने तिला ‘नॅचरल ब्युटी’ असे संबोधत कमेंट केली आहे.

तमन्ना भाटिया दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने बाहुबली या चित्रपटात काम केल्यानंतर ती आणखीन सर्वत्र प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे ती देखील आता दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक महागडी अभिनेत्री झाली आहे. तमन्नाने बॉलीवूडमध्ये देखील अनेक चित्रपटात काम केले आहेत. यामध्ये ‘हमशकल’‌, ‘इंटरटेनमेंट’, आणि ‘हिम्मतवाला’ या चित्रपटांचा समावेश होतो. परंतु तिची खरी ओळख तिला दाक्षिणात्य चित्रपटांनी दिली आहे.

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा