Wednesday, December 3, 2025
Home बॉलीवूड तमन्ना भाटियाने वेगळ्याच अंदाजात केला ‘डोन्ट रश चॅलेंज’ गाण्यावर डान्स, व्हिडिओला ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

तमन्ना भाटियाने वेगळ्याच अंदाजात केला ‘डोन्ट रश चॅलेंज’ गाण्यावर डान्स, व्हिडिओला ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

बाहुबली या चित्रपटात अवंतिकाचे पात्र निभावणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला सगळ्यांनीच भरभरून दाद दिली. नेहमीच बोल्ड आणि हॉट अंदाजात दिसणाऱ्या तमन्नाने या चित्रपटात शूर योद्धाचे पात्र निभावले होते. तमन्ना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोजला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट मिळत असतात. तमन्नाचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिने ‘डोन्ट रश चॅलेंज’ या गाण्यावर बनवला आहे.

तमन्नाने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती तिच्या बेडवर बसली आहे. ती आंबा खाताना दिसत आहे. तिने एका हातात आंबा, तर दुसऱ्या हातात बाउल धरला आहे. तिने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट घातला आहे. आंबा खाताना ती ‘डोन्ट रश चॅलेंज’ या गाण्यावर हावभाव देऊन डान्स करताना दिसत आहे.

तमन्नाने शेअर केलेल्या या व्हिडिओतील तिच्या स्माईलचे सगळेजण खूपच कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करत तिने असे लिहिले आहे की, “गेट मेसी बूरा ना मानो होली हैं, #don’trushchallenge #doingitmyway #happyholi” तमन्ना भाटियाच्या या व्हिडिओला आत्तापर्यंत 5 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

सन 2005 साली तमन्नाने 15 वर्षांची असताना “चांद सा रोशन चेहरा”‌ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने तमिळ, तेलुगु आणि हिंदी या भाषांमधील चित्रपटात काम केले आहे. तमन्नाने या आधी ‘ऍक्शन’ या चित्रपटात काम केले होते तसेच ती लवकरच ‘बोले चुडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत काम करणार आहे. तिने 3 भाषांमध्ये 50 पेक्षाही जास्त चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘गब्बर’ धवनसोबत थिरकली युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, भांगडा नृत्य करत वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया

-व्हिडिओ! ‘कुछ तो है’ मालिकेच्या सेटवरही दिसली होळीची मस्ती, अभिनेत्री कृष्णा मुखर्जीकडून मजेशीर व्हिडिओ शेअर

हे देखील वाचा