Saturday, June 14, 2025
Home बॉलीवूड बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या बोल्ड आणि मादक बॅकलेस अवताराने लावली सोशल मीडियावर आग

बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या बोल्ड आणि मादक बॅकलेस अवताराने लावली सोशल मीडियावर आग

दाक्षिणात्य इंडस्ट्री गाजवल्यानंतर अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात. मात्र त्या सर्वांनाच मोठे यश मिळते असे नाही. काही अभिनेत्री या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये मोठे यश संपादन करतात तर काही बॉलिवूडमध्ये अपयश मिळवल्यानंतर पुन्हा दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडे वळतात. मात्र अभिनेत्री तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) साऊथ आणि हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये मोठे यश मिळवले आहे. तमन्नाने हिंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर मल्टीस्टारर चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावर देखील ती चांगलीच सक्रिय असते. सतत ती स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात देखील राहते.

दिग्दर्शक एसएस राजामौली आणि अभिनेता प्रभास यांच्या ‘बाहुबली’ सिनेमातून संपूर्ण जगात मोठी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटात तिने साकारलेली ‘अवंतिका’ चांगलीच भाव खाऊन गेली. या सिनेमाला मिळालेल्या तुफान प्रेम आणि यशामुळे तमन्नाला मोठी आणि जागतिक ओळख मिळाली. एका योद्धाच्या भूमिकेत तमन्नाने दमदार ऍक्शन देखील केली होती. तिचा हा रफ अँड टफ लूक चांगलाच गाजला. आता नुकताच तमन्नाने इंस्टाग्रामवर तिचा एक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोमधून तमन्नाचा ग्लॅमरस अवतार सर्वांना पाहायला मिळत आहे.

या फोटोमध्ये तमन्नाने तिच्या बॅकलेस लूकने सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे. या फोटोमध्ये तिने फ्लोरल ड्रेस घातला असून, या ड्रेसमध्ये तिची स्ट्रिप्ड ब्लाऊज असून, ते बॅकलेस आहे. या फोटोमध्ये तमन्नाने तिचे केस मोकळे सोडले असून, अतिशय लाईट आणि सुदींग मेकअप केला आहे. तिच्या समोर आगीच्या ज्वाळा दिसत असून यात उभी राहून तिने सुंदर पोज दिल्या आहेत. तिच्या मादक डोळ्यांमुळे या लुकला एक वेगळीच उंची मिळाली आहे.

तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘बबली बाउंसर’ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. तिच्यासोबत या सिनेमात सौरभ शुक्ला, अभिषेक बजाज, साहिल वैद महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. एका माहितीनुसार हा सिनेमा हिंदीसोबतच तामिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा