दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या (tamannaah bhatia) ‘बाहुबली’ चित्रपटातील अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. या चित्रपटातील भूमिकेने तमन्नाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. मात्र या चित्रपटानंतर तमन्ना चित्रपट जगतापासन जणू दुरच गेली होती. बरेच दिवस तिचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नसल्याने तिच्या चाहत्यांनी ती चित्रपटात काम करणार नसल्याचा अंदाज लावला होता, मात्र आता या सगळ्या चर्चांना पुर्नविराम मिळाला असून तमन्ना लवकरच दिग्दर्शक मधुर भांडाकरच्या (Madhur Bhandarkar) चित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तमन्ना भाटिया ही दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या दमदार अभिनयाचे आणि सौंदर्याचे नेहमीच कौतुक होत असते. तमन्नाने ‘बाहुबली’ या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. काही दिवसांपुर्वी ती दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या कार्यालयाबाहेर दिसली होती, त्यामुळे त्याच्या चित्रपटात काम करणार असल्याचा अनेकांनी अंदाज लावला होता, आता हा अंदाज खरा ठरला असल्याचे ऐकायला मिळत आहे, कारण तमन्ना लवकरच दिग्दर्शक मधुर भांडाकरच्या ‘बबली बाउंसर’ या चित्रपटात काम करणार असल्याची बातमी समोर आली आहे, इतकेच नव्हेतर या चित्रपटाचे पहिल्या टप्प्यातील शुटिंगही पूर्ण झाले आहे.
MADHUR BHANDARKAR – TAMANNAAH BHATIA: 'BABLI BOUNCER' FIRST SCHEDULE ENDS… #BabliBouncer – starring #TamannaahBhatia and directed by #MadhurBhandarkar – has completed its first shooting schedule… Will release in #Hindi, #Tamil and #Telugu. pic.twitter.com/1DfNkAIHxc
— taran adarsh (@taran_adarsh) March 9, 2022
याबाबत संपुर्ण माहिती अशी की, १८ फेब्रुवारीला एका माध्यमाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन तमन्ना आणि मधुर भांडारकरचा एक फोटो शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली होती. या फोटोसोबत “जपुन राहा बंधु आणि भगिनींनो, बबली बाउंसर येत आहे,तमन्ना भाटिया आपल्या कामावर येत आहे, आता कुणाचा दात तुटणार की ह्रदय याचे उत्तर फक्त मधुर भांडाकरकडे आहे” असा कॅप्शन दिला होता. हा फोटो आणि कॅप्शनवरुन चित्रपटात तमन्ना एक्शन सीन करणार असल्याचे समजत आहे. चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यातील शुटिंग पुर्ण झाली असल्याची माहितीही तरम आदर्श यांनी दिली आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता तमन्नाच्या चाहत्यांना या चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे.
दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा