Monday, July 1, 2024

तमाशा लाईव्ह म्हणतंय ‘फड लागलाय’, सिद्धू अन् हेमांगी दिसतायत धमाल अंदाजात

येत्या १५ जुलै रोजी ‘तमाशा लाईव्ह’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील नवे गाणे ‘फड लागलाय’ हे गाणं प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित झालं आहे. अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. हे गाणं ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठीच्या शर्यतीबद्दल आहे.

हे गाणं साजन बेंद्रे आणि वैशाली सामंत यांनी गायले आहे. तसेच या गाण्याचे गीतकार क्षितीज पटवर्धन असून गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. हे गाणं अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री हेमांगी कवी यांच्यावर चित्रीत झालं आहे, तर उमेश जाधव हे नृत्यदिग्दर्शक आहेत.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा