Saturday, October 19, 2024
Home साऊथ सिनेमा अभिनेता जयम रवीने पत्नी विरोधात दाखल केली तक्रार; सोशल मिडीयावरून काढले सर्व फोटोज…

अभिनेता जयम रवीने पत्नी विरोधात दाखल केली तक्रार; सोशल मिडीयावरून काढले सर्व फोटोज…

तामिळ अभिनेता जयम रवी आणि त्याची पत्नी आरती यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. जयम रवी यांनी पत्नी आरतीपासून घटस्फोट घेतल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. यानंतर आता त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पत्नीचे सर्व फोटो हटवले आहेत. फोटो काढून टाकल्यानंतर जयम रवीने पत्नी आरतीविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.

अभिनेता जयम रवी यांनी पत्नी आरतीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पत्नी आरतीने जयम रवीला आपल्याच घरातून हाकलून दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जयम यांनी अड्यार पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदवली आहे. अहवाल नोंदवल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, अभिनेत्याने त्याच्या ईसीआर रोडवरील घरातून सामान परत मिळविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची मदत देखील मागितली होती.

जयम रवी आणि आरती यांच्या घटस्फोटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. दोघांनी घटस्फोट घेण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, जयम रवीचे गायिका केनिशा फ्रान्सिससोबत अफेअर असल्याचीही चर्चा आहे. यावर अभिनेता जयमने मौन सोडले. सायकॉलॉजिस्ट असल्याने गायिका केनिशाला भेटत होतो, कोणाचेही नाव ओढणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या एका संवादादरम्यान जयम रवी म्हणाला, ‘जेव्हा लोक माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतात, जी मी वर्षानुवर्षे मेहनत आणि स्क्रिप्ट्स निवडून बनवली आहे, तेव्हा मी फक्त हसतो. माझे नाव खराब करणे सोपे नाही. तुम्हाला असे वाटत असेल की या घोषणेने संपूर्ण गोष्ट समोर आली, तर तसे नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

पती सोबत बीचवर गेली परिणीती चोप्रा; खास लव्ह नोट सह दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा