Wednesday, July 3, 2024

दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी आणि रवींद्र चंद्रशेखरन पुन्हा त्यांच्या ‘या’ फोटोंमुळे झाले ट्रोल

महालक्ष्मी ही तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेक मालिका आणि चित्रपटात काम करणाऱ्या महालक्ष्मीने काही महिन्यांपूर्वी तमिळ चित्रपटसृष्टीतील चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक रविंद्र चंद्रशेखरनसोबत लगीनगाठ बांधली. त्यांचे लग्न सोशल मीडियावर तुफान गाजले. सोबतच त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून अनेकांनी त्यांना तुफान ट्रोल केले. कारण रविंद्र चंद्रशेखरन हा खूपच जाड असून, महालक्ष्मी खूपच बारीक आहे. त्यांच्या या वेगळ्या जोडीवरून त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र दोघांनीही याकडे सर्रास दुर्लक्ष करत आपला आनंद कायम ठेवला. नुकतेच महालक्ष्मीने पुन्हा एकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे.

झाले असे की, काही दिवसांपूर्वीच महालक्ष्मी आणि रवींद्र यांच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाले. त्याबद्दल रवींद्रने एक पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या. सोबतच त्याने त्या दोघांचा एक छान फोटो देखील शेअर केला आहे. त्यावरून त्या दोघांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. रवींद्रने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “माझा आनंद यासाठी नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो, तर यासाठी आहे की तू माझ्यासाठी जगात आहेस. मी जरी हे सांगू शकत नाही. अम्मू मी या १०० दिवसांच्या पोस्टसाठी चांगले कॅप्शन लिहिल्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र मी काव्यात्मक लिहू शकत नाही. मी लिहीत आहेत जे मला जाणवते. अम्मू मी ३७ वर्षानंतर १०० दिवस प्रत्येक सेकंद आनंदाने जगलो आहे. यालाच अजून जास्त प्रेम काळजी, मस्ती, भांडणांसोबत पुढे नेत राहा.” यावर महालक्ष्मीने लिहिले, “तू नेमीचं माझ्या डोक्यात माझ्या विचारात आहेस आणि माझ्या हृदयात प्रेम म्हणून आहेस.”

यावर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करताना हे सर्व केवळ पैशासाठी असल्याचे सांगितले आहे. या सर्व ट्रोलर्सला उत्तर देताना महालक्ष्मीने लिहिले, “लोकं पाहिजे ते बोलू दे, मी तुझ्यावर तोपर्यंत प्रेम करत राहील जोपर्यंत माझे ह्रदय बंद होत नाही.”

दरम्यान रविंद्र चंद्रशेखरन हा तमिळ चित्रपटसृष्टीतील चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक असून, तो बऱ्याच वर्षापासून चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे. २०१३ मध्ये त्याने स्वत:चे लिब्रा प्रोडक्शन्स नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले असून, ‘सुत्ता कधई या चित्रपटाची त्याने निर्मिती केली आहे. तर महालक्ष्मी ही आधी व्हिडीओ जॉकी म्हणून करत होती. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिने अनेक प्रसिद्ध सीरियलमध्ये काम केले. तसेच सध्या ती तमिळ चित्रपटांमध्ये झळकताना दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा