Monday, July 8, 2024

खूपच वाईट झालं यार! फेशियल ट्रीटमेंटने केला अभिनेत्रीचा चेहरा बर्बाद, दिसायची ‘इतकी’ सुंदर

मनोरंजन जगाशी संबंधित असलेल्या व्यक्तींसाठी स्वत: ला तंदुरुस्त ठेवणे आणि आपल्या रंग- रूपाकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते. त्यांचा चेहरा आणि बाह्य सौंदर्य टिकवून ठेवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण ते स्वत: ला कोट्यवधी प्रेक्षकांसमोर सादर करतात. ज्यासाठी त्यांना सादर करण्यायोग्य आणि आकर्षक दिसणे आवश्यक असते.

अलीकडेच तमिळ अभिनेत्री रायजा विल्सनने डॉक्टरांकडून चेहऱ्यावर उपचार करून घेतले. करमणुकीच्या जगाशी संबंधित असलेल्या लोकांमध्ये असे करणे सामान्य आहे. पण रायजा विल्सनला हे चेहऱ्याचे उपचार महागात पडले, ज्यामुळे ती आता चर्चेत आहे.

वास्तविक, तमिळ अभिनेत्री रायजा विल्सन हिने नुकतेच तिच्या चेहऱ्यावर डॉक्टरांकडून उपचार घेतले. पण या उपचारामुळे तिच्या चेहर्‍यावर खूप वाईट परिणाम झाला आणि तिचा चेहरा सुजला. तिच्या बिघडलेल्या चेहऱ्याचा एक फोटो इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये शेअर करत तिने याबद्दल माहिती दिली.

रायजा विल्सनने तिचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “मी डॉक्टर भैरवी सेंथिल यांच्याकडे चेहऱ्याच्या किरकोळ उपचारासाठी गेले होते. एक वेगळी प्रक्रिया करण्यासाठी तिने माझ्याकडे विनंती केली. मला या प्रक्रियेची आवश्यकता नव्हती पण तिने मला खूप सक्ती केली आणि या उपचाराचा हा परिणाम झाला. ती आता मला भेटायला किंवा माझ्याशी बोलायलाही तयार नाही. तिचे कर्मचारी म्हणत आहेत की, ती शहराबाहेर गेली आहे.”

यासह रायझाने काही स्क्रीनशॉट्स देखील शेअर केले, ज्यात लोक या डॉक्टरची निंदा करत आहेत. लोकांच्या म्हणण्यानुसार, याअगोदरही असे झाले आहे की, डॉक्टरांच्या बळजबरीपणामुळे लोकांच्या चेहऱ्यावर वाईट परिणाम झाला आहे.

https://www.instagram.com/p/CMFBv6-DL-V/?utm_source=ig_web_copy_link

रायजा विल्सनचे हे फोटो पाहून तिचे चाहते खूप निराश आणि दुःखी झाले आहेत. कारण अभिनेत्री कायम इंस्टाग्रामवर सक्रिय राहून, तिचे खूप सुंदर फोटो शेअर करत असायची. रायजाच्या सौंदर्याबद्दल चाहते अक्षरशः वेडे आहेत. हेच कारण आहे की, इंस्टाग्रामवर तिचे १.५ दशलक्षाहून अधिक फॉलोवर्स आहेत.

रायजा विल्सनला ‘बिग बॉस तमिळ’च्या पहिल्या सिझनमध्ये ओळख मिळाली होती, ज्याला सुपरस्टार कमल हासनने होस्ट केले होते. या शोमध्ये अभिनेत्री एक स्पर्धक म्हणून दिसली होती. यानंतर ती ‘बिग बॉस’ तमिळ २ च्या दुसर्‍या सिझनमध्ये पाहुणी म्हणूनही सामील झाली होती.

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती धनुष आणि अमला पॉलच्या ‘वेलिला पट्टाधारी २’ मध्ये दिसली आहे. हा चित्रपट २०१७ मध्ये रिलीझ झाला होता. ‘प्यार प्रेमा काधल’ या चित्रपटात अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसली होती. २०१८ मध्ये रिलीझ झालेल्या या चित्रपटात तिच्यासोबत हरीश मुख्य भूमिकेत होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगणाऱ्या अभिनेत्रीने केला बोल्ड फोटो शेअर, म्हणाली ‘…मी व्हर्जिन आहे?’

-भारीच! चौदा वर्षांपुर्वी अभिषेकबरोबर झालेल्या लग्नात ऐश्वर्या रायने घातली होती एवढ्या लाखांची साडी

-काय सांगता! करन-अर्जुनमधील शाहरुखची प्रेयसी झालीय साध्वी, बॉलीवूडला ठोकलाय कायमचा राम-राम

हे देखील वाचा