गुन्हेगारीच्या इतिहासात अनेकदा नातेसंबंध तोडून खून करण्यात आला आहे. ही हत्या फक्त सामान्य माणसातच घडली नाही, तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनाही यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. या हत्येमागील कारण काहीही असू शकते, परंतु पोलिसांना खुनीचा शोध घेण्यास चांगलीच मेहनत घ्यावी लागते. बरेच खून हे अजूनही एक रहस्य आहेत, जे उघड होऊ शकले नाही. काही खून प्रकरणांमध्ये आरोपी सापडला, आणि आज तो तुरुंगात आहे. पण प्रश्न उद्भवतो की, कोणत्या परिस्थितीत एखादी व्यक्ती दुसर्या व्यक्तीला ठार मारण्याचा विचार करू शकते? आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिच्या निर्दयी हत्येने चाहत्यांना धक्का बसला होता. प्रत्येकाला हा विचार करण्यास भाग पाडले गेले होते की, कोणी इतके निर्दय कसे असू शकते.
शशिरेखा असे या अभिनेत्रीचे नाव होते. ती तमिळ टीव्हीची एक प्रसिद्ध अभिनेत्री होती, पण प्रेम करणाऱ्यानेच तिला संपवले. वास्तविक, शशिरेखा हिचा पती रमेश शंकर याचे दुसर्या एका महिलेशी (व्यवसायाने अभिनेत्री) प्रेमसंबंध होते. शशिरेखा दोघांच्या प्रेमामध्ये येत होती. त्यामुळे हा भयानक खुनाचा कट रचला गेला होता.
सन २०१६ मध्ये, पोलिसांना तमिळनाडूच्या रामपुरममध्ये एक डोके नसलेला मृतदेह सापडला होता. सर्व प्रयत्नानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. रामपुरमपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शशिरेखाचा मृतदेहही ताब्यात घेण्यात आला होता. अभिनेत्री शशिरेखाच्या नवऱ्याने (रमेश शंकर) तिचा शिरच्छेद केला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी, शंकर आणि त्याच्या मैत्रिणीला अटक केली असता, संपूर्ण घटना उघडकीस आली होती. शंकरने सांगितले होते की, ‘शशिरेखाचे हे दुसरे लग्न होते. तिला एक आठ वर्षाचे मूलही होते. शशिरेखा हिला या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली, तेव्हा ती भांडत असे.’
शंकरने सांगितले की, कशी रागाच्या भरात आपल्या पत्नीची हत्या त्याने केली होती. त्यानंतर तिचे कपडे काढून तिचे शीर कापून काढले, कारण असे केल्याने यासाठी तिला बलात्कार व हत्येच्या घटनेसारखे सादर केले जाईल.
रमेश शंकर आणि त्याच्या लिव्ह-इन पार्टनरने, शशिरेखाचे डोके दोन दिवस बाथरूममध्ये बंद केले होते, आणि संधी मिळताच प्रेताला त्यांनी फेकून दिले होते. जेव्हा शशिरेखाच्या कुटुंबियांनी हरवल्याचा अहवाल दाखल केला, तेव्हा सर्व घटना उघडकीस आल्यानंतर आरोपींना पकडण्यात आले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘वडिलांनाच मानले होते बॉयफ्रेंड’, नीना गुप्ता यांनी केला वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा
-दगडाने संगीत वाजवत मुलाने ट्रेनमध्ये गायलं अरिजित सिंगचं गाणं; पाहा मन जिंकणारा व्हिडिओ










