Saturday, June 29, 2024

कैकला सत्यनारायन अंतिमक्षणी दर्शनास पोहोचले चिरंजीवी आणि पवण कल्यान, भावूक करणारे फोटो व्हायरल

तेलुगू इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता कैकला सत्यनारायन यांचे (दि, 23 डिसेंबर) रोजी हैद्राबादमधील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 87 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. वयानुसार ते अनेक दिवसांपसासून आरोग्याच्या अनेक समस्यांना झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे.

तेलुगू इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकार कैकला सत्यनारायन (Kaikalya Satyanarayan) हे अनेक दिवसांपासून वयानुसर आजारपाणाला झुंझ देत होते. त्यांनी हैद्राबादमधील त्यांच्या राहत्या घरी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे एकूण वय 87 एवढे होते. त्यांच्या निधनाने कला विश्वात शोककळा पसरली आहे. अंतिमक्षणी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तेलुगू इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यपैकीच लोकप्रिय कलाकार आणि राजकारणी चिरंजिवी (Chiranjeevi) आणि अभिनेता पवन कल्याण (Pawan Kalyan) हेही आले होते.

कैकला सत्यनारायन यांच्या निधनाने पवण कल्याण आणि चिरंजीवी हळहळल्याचे दिसून आले. त्यांनी दिग्गज अभिनेत्याचे दर्शन घेतले आणि प्रर्थना केली आहे. त्याशिवया या दोघेही कुटुंबाला संत्वना देतानाही दिसून आले. दोघांच्या चेहऱ्यावरही दु:ख स्पष्ट दिसून होते. यांच्याशिवया अल्लू अर्जुन (Allu Arjun), राम चरण (Ram Charan), महेशा बाबु ( Mahesha Babu) यासारख्या प्रसिद्ध कालाकारांनीही श्रद्धांजली वाहिली.

pawan kalyan and chiranjivi

कैकला सत्यनारायण यांचा जन्म 25 जुलै 1935 रोजी कृष्णा जिल्ह्यातील कवुताराम गावात झाला. निर्माते डीएल नारायणाने त्यांची माहिती घेतली आणि त्यांना 1959 मध्ये सिपायी कूथुरुमध्ये भूमिका दिली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करण्यात अयशस्वी ठरला. मात्र, तरीही, ते एनटीआर सारखेच होते की, त्यांना अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता-राजकारणीला फसवले. त्यानंतर एनटीआरने अपूर्व सहस्र सिरचेदा चिंतामणीमध्ये सत्यनारायणासाठी त्यांनी भूमिका दिली होती. यांनतर अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये मागे वळून पाहिले नाही.

कैकल्या सत्यनारायन कलाकारानंतर निर्माताही बनले. अभिनेता बनून त्यांनी एकूण 750 पेक्षाही जास्त चित्रपाटामध्ये काम केले आहे. कोडामा सिहंम, बंगारू कुटुम्बम, मुद्दुला मोगुडू या गाजणाऱ्या चित्रपटांची निर्मिती देखिल केली. त्याशिवाय कैकल्या यांनी राजकारणातही काम सुरु केले होते. त्यांच्या अभिनयातील कामाला सन्मानित करण्यसाठी त्यांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विवेक अग्निहोत्री निघाले 5 सुरक्षा रक्षकांसह मॉर्निंग वॉकला, पाहा व्हायरल व्हिडिओ
राम-लखन पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर, ‘या’ चित्रपटात पाहायला मिळणार ‘ही’ धमाकेदार जोडी

हे देखील वाचा