Saturday, June 29, 2024

चित्रपटसृष्टीवर दु: खाचा डोंगर! प्रसिद्ध दिग्दर्शक- छायाचित्रकाराचे हृदयविकाराने निधन, अनिल कपूरच्या चित्रपटात केले होते काम

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दु: खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि छायाचित्रकार (सिनेमॅटोग्राफर) केवी आनंद यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. ते ५४ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात फोटो जर्नलिझमपासून केली होती.

त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध छायाचित्रकार पीसी श्रीराम यांच्यासोबत गोपुरा वसलिले, मीरा, देवर मगन, अमरान आणि थिरुडा थिरुडा यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक म्हणून काम केले होते.

श्रीराम यांनी सन १९९९ मध्ये त्यांचे नाव मल्याळममधील थेनमाविन कोंबथ चित्रपटासाठी सुचवले होते. हा आनंद यांचा छायाचित्रकार म्हणून पदार्पणाचा चित्रपट होता. या चित्रपटासाठी त्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित केले होते.

सन २००५ मध्ये ‘काना कांडन’ या चित्रपटातून दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. सन २००८ मध्ये त्यांनी ‘अयान’ या ऍक्शन मनोरंजन चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. यामध्ये सुपरस्टार सूर्या आणि तमन्ना भाटिया हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने त्यावेळी कमाईचे नवीन विक्रम रचले होते.

याव्यतिरिक्त त्यांनी बॉलिवूडमध्येही छायाचित्रकार म्हणून काम केले. त्यांनी हिंदी चित्रपट ‘डोली सजा के रखना’, ‘जोश’, अनिल कपूर अभिनित ‘नायक- द रिअल हिरो’, ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’ आणि ‘खाकी’ मध्येही काम केले होते.

विशेष म्हणजे ते भारतीय छायाचित्रकार सोसायटीमधील संस्थापक सदस्यांपैकी एक होते.

त्यांचा जन्म ३० ऑक्टोबर, १९६६ रोजी चेन्नईच्या पार्क टाऊनमध्ये झाला होता. त्यांनी चेन्नईमधूनच आपले शिक्षण पूर्ण केले आणि काम सुरू केले होते.

त्यांच्या निधनानंतर त्यांचे चाहते आणि दिग्गज निर्मातेही सोशल मीडियावर दु: ख व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे

-याला म्हणतात गाण्याची जादू! हिमेश रेशमियाच्या ‘या’ गाण्यामुळे सापडला होता खरा चोर, दोन रात्रीत उडवले होते एक लाख रुपये

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा