Tuesday, July 9, 2024

कोरोना नियमांचे उल्लंघन! मास्क न घालता चाहता घेत होता सेल्फी, ‘थाला’ अजितने हिसकावला फोन, पाहा व्हिडिओ

तामिनाडूमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या प्रकारे काळजी घेऊन मतदान केले जात आहे. या दिवशी अनेक कलाकारांनी आणि राजनेत्यांनी मतदानाच्या ठिकाणी हजेरी लावली आहे. यात के. पलानीस्वामी, ओ. पनीरसेल्वम, एम. के. स्टॅलिन, रजनीकांत, अजित कुमार, विजय आणि कमल हासन यांसारख्या नेते- कलाकार मंडळींनी देखील हजेरी लागली होती. या मतदान केंद्रावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

ट्विटरवर व्हायरल होणारा हा व्हिडिओ अजित कुमारने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अजित कुमारचा एक चाहता त्याच्या पत्नीसोबत मतदान केंद्रावर मतदान करायला आलेला असतो. त्यावेळी तो अजित कुमार सोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याने तोंडाला मास्क लावलेला नसतो, तेव्हा अजित त्याच्या हातातून त्याचा मोबाईल हिसकावून घेतो. दुसऱ्या व्हिडिओमध्ये असे पाहायला मिळते की, तो कशाप्रकारे त्याच्या चाहत्याला त्याचा मोबाईल परत देऊन त्याची माफी मागतो.

अजित कुमारला पाठिंबा देणारे त्याचे चाहते त्याच्या या कृत्याबद्दल त्याचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर चाहत्याने सांगितले की, कोरोना नियमाचे पालन न केल्याने कशाप्रकारे त्याला अभिनेत्यानेे धडा शिकवला. पण नंतर त्याला त्याचा मोबाईल परत देऊन त्याने त्या चाहत्याला सॉरी देखील म्हटले आहे.

परंतु अजित कुमार यांच्या विरोधात बोलणारे अनेकजण त्याच्या या वागण्यावरून त्याला चुकीचे समजत आहेत. सगळ्यांनाच आता ही गोष्ट माहित आहे की, संपूर्ण भारतात कोरोना विषाणूचा प्रसार खूप वेगाने होत आहे. अशामध्ये स्वतःची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. पण जर आपण तसे करत नसू तर इतर कोणीतरी या गोष्टीची जाणीव करून देणे खूप महत्त्वाचे असते. अनेक कलाकार जनतेला या गोष्टीची वारंवार माहिती देताना दिसतात. या कोरोनाची लागण बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना देखील झाली आहे. यामध्येे कॅटरिना कैफ, अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, विकी कौशल यांसारख्या कलाकारांचा समावेश होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जोडप्याच्या ‘बारिश की जाए’ गाण्यावरील डान्सने जिंकले सर्वांचे मन, गायक बी प्राकने शेअर केला जबराट व्हिडिओ

-नाचा रे! वडील कमल हासन यांच्या निवडणूक प्रचारासाठी अभिनेत्रीने लावले ढोल- ताशावर ठुमके, पाहा जबरदस्त डान्स व्हिडिओ

-‘मूर्खपणा शिगेला पोहोचला आहे’, मास्क न लावल्यामुळे टीव्ही कलाकारांनी सुनावले कंगना रणौतला खडेबोल

हे देखील वाचा