बाॅलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपमा खेर (Anupam Kher) यांच्या दिग्दर्शनात तयार झाला आहे. चला जाणून घेऊया की, लाेकांना हा ट्रेलर कसा वाटताेय आणि ते काय प्रतिक्रिया देत आहेत !
अनुपम खेर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. आज (साेमवारी) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय आणि प्रेक्षक तर याची खूपच आतुरतेने वाट पाहत हाेते. ट्रेलर समाेर येताच चाहत्यांनी लगेचच आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि ट्रेलरचं जाेरदार कौतुक सुरू झालं. चला पाहूया, फॅन्स नेमकं काय म्हणालेत !
अनुपमा खेर यांच्या ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटचं ट्रेलर प्रदर्शित झाला आहे आणि लाेक त्यांचं कौतुक करतायत. एका युजरने इन्स्टाग्रामवर लिहिलं, “ट्रेलर पाहून अंगावर काटा आला! आता चित्रपट कधी प्रदर्शित हाेताेय, याची वाट पाहणं जड जातयं”. दुसऱ्याने युजरने लिहिलं, “आता अजून 18 दिवस थांबावं लागणार, फारच उत्सुकता आहे”. एका युजरने म्हटलं, “खूपच छान आणि प्रेरणा देणारी गोष्ट वाटतेय.” आणखी एका युजरने लिहिलं, “ही स्टाेरी खूप इंटरेस्टिंग, इमाेशनल आणि आपल्याशी जाेडली गेलेली वाटतेय. संकल्पनाही भारी आहे. ऑल द बेस्ट सर! हा चित्रपट नक्कीट हिट हाेणार. आणि विशेष म्हणजे शुभांगीचं अभिनय तर जबरदस्त !”
या सिनेमात अनुपम खेर तन्वीच्या आजोबांची भूमिका करत आहेत, जे आर्मीमधून रिटायर झालेले कर्नल आहेत. करण टाकरनं तिच्या वडिलांची भूमिका केली आहे. चित्रपटाची कथा आर्मीच्या पार्श्वभूमीवर आहे. ३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये शुभांगी दत्त, अनुपम खेर आणि पल्लवी जोशी चांगलेच दिसून येतात. त्यांच्यासोबत बोमन ईरानी, जॅकी श्रॉफ, अरविंद स्वामी आणि करण टाकर यांची झलकसुद्धा पाहायला मिळते.
ट्रेलरमधून लक्षात येतं की, हा चित्रपट देशभक्ती, आर्मी लाईफ, फॅमिली ड्रामा, इमोशन्स आणि एका स्पेशल चाइल्डच्या गोष्टीवर आधारित आहे. कुलमिलावून, चित्रपटाची एक भावनिक आणि प्रेरणादायक सफर घडवणार असाच वाटतो.
अनुपम खेर दिग्दर्शित ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट 18 जुलैला सिनेलागृहामध्ये प्रदर्शित हाेताेय. या चित्रपटात इयान ग्लेन, जैकी श्रॉफ आणि एम.नासर यांच्याही महत्तवाच्या भुमिका आहेत. या चित्रपटाचं संगीत ऑस्कर जिंकलेल्या एम.एम कीरवानी यांनी दिलयं. या चित्रपटाची निर्मिती अनुपम खेर स्टुडिओने एनएफडीसी साेबत मिळून केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
लूक बॅकलस पण टेन्शन फ्री ! हे हॅक्स बघितल्याशिवाय ड्रेस घालू नका!