बिग बॉस 19’ची रंगत काहीही असो, पण या सीझनमधील चर्चेत राहिलेल्या स्पर्धकांमध्ये तान्या मित्तलचं (Tanya Mittal)नाव पहिल्या रांगेत येतं. शोमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिल्यानंतर तान्याने बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या खाजगी पसंती, लाइफस्टाइल आणि बॉडीगार्डबाबत उघडपणे मत मांडले आहे. स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी तान्या म्हणते, माझं आयुष्य माझ्या नियमांवर चालतं; इतरांनी त्यावर बोट ठेवण्याची गरज नाही.
एका दिलेल्या मुलाखतीत तान्याने सांगितले की तिच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड ठेवण्यावर अनावश्यक चर्चा केली जात आहे. कोणतीही महिला वेगळा निर्णय घेतली की लोक त्यावर बोलायला लागतात. सुरक्षा हा जेंडरचा मुद्दा नाही. ज्याच्या आवाक्यात आहे, तो आपल्यासाठी व्यवस्था करतो. यात चुकीचे काहीच नाही, असे ती म्हणाली.तान्याच्या मते, वैयक्तिक सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करणे म्हणजे एखाद्याच्या वैयक्तिक अधिकारावर आघात करणे आहे.
शोदरम्यान अनेकदा तान्याला ‘फेक’ असल्याचे आरोप सहन करावे लागले. सोशल मीडियावरही तिच्या लाइफस्टाइलवर आणि बोलण्याच्या ढंगावर टीका झाली. मात्र तान्या म्हणते, मी नेहमीच बिंदास आणि स्पष्टवक्ती राहिले आहे. माझा परिवार, माझं वातावरण आणि माझ्या मेहनतीची कमाई यावर मी समाधानी आहे. 30 वर्षांची महिला जर स्वतःसाठी काही करू शकत असेल, तर त्यात चुकीचं काय?
बिग बॉसच्या प्रवासाबद्दल तान्याने सांगितले की लोक तिला कधीकधी जास्त समजतात, पण तिची हीच बेधडक शैली तिला वेगळं बनवते.जिंदगीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला स्विकारणं, असे ती म्हणाली.ग्रँड फिनालेमध्ये तान्याने दमदार परफॉर्मन्स दिला आणि तिच्या एविक्शननंतर सलमान खाननेही तिच्या गेमचे कौतुक केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
बॉबी देओल-अक्षय खन्ना यांच्या परत येण्याने फॅन्स उत्साहित; हमराज 2’साठी सोशल मीडियावर जोरदार मागणी










