Wednesday, June 26, 2024

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेल्या टांझानियाचे किली आणि निमा पॉल नक्की आहेत तरी कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात टिकटॉक स्टार असणाऱ्या किली आणि निमा यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, “भारतीय संस्कृती आणि आपल्या परंपरा यांच्याबद्दल बोलताना दोन लोकांची भेट घालून देऊ इच्छितो. सध्याच्या दिवसांमध्ये फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या तिन्ही सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर टांझानियाचे भाऊ बहीण असलेले किली पॉल आणि निमा सध्या चांगलेच गाजत आहे. मला विश्वास आहे की, तुम्ही या दोघांबद्दल खूप काही ऐकले असेल आणि त्यांचे व्हिडिओ देखील पाहिले असतील. किली आणि निमा यांच्यामध्ये भारतीय संगीताबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे या कारणांमुळे ते खूपच लोकप्रिय आहेत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात मधील हे बोलणे ऐकून अनेकांच्या मनात हा प्रश्न उठत आहे की, किली आणि निमा नक्की आहेत तरी कोण? ते असे कोणते काम करतात ज्यामुळे ते भारतात एवढे लोकप्रिय झाले आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

किली आणि निमा टांझानिया या भावाबहिणीच्या जोडीने ऑन-पॉइंट लिप-सिंक आणि ग्रूवी कोरियोग्राफीसोबत नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ घातली आहे. किलीला इंस्टाग्रामवर २.६ मिलियन्सपेक्षा अधिक फॉलोवर्स असून, या अकाऊंटवरून तिने स्वतःला डान्सर आणि कंटेंट क्रियेटर म्हटले आहे. तर त्याच्या बहिणीला निमा पॉलला २५९ हजार लोकं फॉलो करतात. टांझानियाचे हे भाऊ बहीण त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हिंदी गाण्यांवरील लिपसिंक व्हिडिओ आणि डान्स व्हिडिओ शेअर करतात. नुकताच या दोघांनी ट्रेडिशनल मासई ड्रेस घालून शेरशहा सिनेमातील ‘राता लंबिया’ गाण्यावर लिपसिंक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर ही भावाबहिणीची जोडी इंटरनेट सेन्सेशन बनली.

आफ्रिकन देश असलेल्या टांझानियाचे डान्सिंग स्टार असलेल्या किली पॉलला नुकत्याच टांझानियामध्ये असलेल्या हाय कमिशन ऑफ इंडियाकडून सन्मानित केले गेले. हाय कमिशन ऑफ इंडियाच्या डिप्लोमॅट बिनाया प्रधानने एक फोटो शेअर करत ही माहिती दिली होती.

हेही वाचा

हे देखील वाचा