Saturday, June 29, 2024

अनन्या पांडे आणि तारा सुतारियाची मारामारी? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. अनन्याने ताराची काही सेकंदांची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये सीटवर बसलेली तारा सुतारिया मागे वळून तिला चिडवताना दिसत आहे. यासोबत अनन्याने एस (तारा) स्पॉटेड असा कॅप्शन दिला आहे. त्याचवेळी तारा सुतारियाने अनन्या पांडेची एक व्हिडिओ क्लिप देखील शेअर केली आहे, जी खूप मजेदार आहे.

या व्हिडिओमध्ये अनन्या पांडे अचानक सीटच्या मागून कॅमेऱ्यासमोर दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्री कॅमेऱ्यात खूप मजेदार एक्सप्रेशन देताना दिसत आहे. यासोबतच तारा सुतारियाने कॅप्शनमध्ये सर्वत्र माझा पाठलाग करत आहे, म्हणत अनन्याची थट्ट केली आहे. तारा सुतारिया आणि अनन्या पांडे अलीकडेच प्रवासादरम्यान एकमेकांना भेटल्या होत्या.

हेही वाचा –

कुणालच्या पार्टीत जान्हवीचा राडा, डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल
कोरोनाने केलेत बिग बिंचे हाल! पोस्ट शेअर करत मांडली व्यथा
बापरे! सुगंधा मिश्राचा चेहरा बिघडला? व्हिडिओ पाहून व्हाल चकित

हे देखील वाचा