बॉलिवूडमधील नाती नेहमीच सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. कारण या क्षेत्रात नाती तुटतात आणि लगेच नवीन नाती जोडली देखील जातात. यामुळे या नात्यांवर अनेकदा टीका करत प्रश्नचिन्ह उभे केले जाते. लोकांच्या विचारानुसार बॉलिवूडमधील नाती ही पैसा आणि प्रसिद्धी या दोन गोष्टींभोवतीच फिरत असतात. एकीकडे नवीन वर्ष मोठ्या जल्लोषात सुरु झाले आणि नवनवीन सकारात्मक बातम्या देखील समोर यायला लागल्या. मात्र यातच एक वाईट बातमी बॉलिवूडमधून येत आहे. बॉलिवूडमधील एका सर्वात प्रसिद्ध जोडप्याचे ब्रेकअप झाले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री तारा सुतारीया आणि आदर जैन यांचे ब्रेकअप झाले आहे. ब्रेकअपचा निर्णय त्या दोघांनी मिळून विचारपूर्वक घेतला असल्याचे देखील समजत आहे. ब्रेकअप झाले असले तरी या दोघांनी त्यांची मैत्री मात्र तशीच ठेवल्याचे सांगितले जात आहे. ताराला नेहमीच कपूर कुटुंबातील प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमात आदरसोबत पाहिले जायचे. मात्र रणबीर कपूरचे लग्न आणि ख्रिसमस पार्टी या दोन्ही कार्यक्रमांमध्ये ती नव्हती. यावरूनच मीडियामध्ये त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चाना उधाण आले आहे. तारा आणि आदर मागील काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांची पहिली भेट २०१८ साली एका दिवाळी पार्टीमध्ये झाली. आता चार वर्षानंतर त्यांचे नाते संपल्याचे सांगितले जात आहे. याबद्दल दोघांकडून अजूनपर्यंत कोणतीच माहिती समोर आली नसली तरी बॉलिवूडच्या जगतात त्यांच्या ब्रेकअपबद्दल बोलले जात आहे.
View this post on Instagram
कामाबद्दल सांगायचे झाल्यास ताराने स्टुडंट ऑफ द इयर २ सिनेमातून करियरची सुरवात केली. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये दिसली. मात्र तिला या इंडस्ट्रीमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. तरच शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा ‘एक व्हिलन रिटर्न होता’. आता ती ‘अपूर्वा’ या सिनेमात झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कडक! शिवानी बावकरचे फोटो पाहून लागिर झालं जी
रश्मी देसाईचा हटके लूक! चाहत्यांना पाडतोय भुरळ, पाहा फोटो गॅलरी