Monday, July 1, 2024

कुटुंबाने का केले नाहीत तारक मेहता यांचे अंत्यसंस्कार? घ्या कारण जाणून…

प्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘ याची लोकप्रियता आज इतकी वाढली आहे की, हा शो प्रत्येक घराघरात पाहायला मिळतो. इतकंच नाही, तर हा शो आजच्या काळात प्रेक्षकांचा आवडता शो बनला आहे, पण तुम्हाला माहित आहे का? की, हा शो भारतातील प्रसिद्ध कॉमेडियन आणि नाटककार तारक मेहता यांची देणगी आहे. हा शो तारक मेहताच्या ‘दुनिया ने उंधा चष्मा’ या रचनेपासून प्रेरित आहे. आज म्हणजेच 1 मार्चला तारक मेहता यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबधीत काही रंजक किस्से…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोमुळे तारक मेहताचे नाव आज प्रत्येक मुलाच्या ओठावर आहे, परंतु आजही असे बरेच लोक आहेत, ज्यांना खऱ्या तारक मेहताबद्दल माहिती नाही. तारक मेहता यांनी लिहिलेली ‘दुनिया ने उंधा चष्मा’ ही रचना गुजराती भाषेत लिहिली होती. या रचनेवर आधारित, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ नावाचा टीव्ही शो सुरू झाला, जो आज चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

तारक मेहता यांचे प्रदीर्घ आजाराने अहमदाबाद येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ गुजरातमधील त्यांचे चाहतेच दु:खी झाले नाहीत, तर देशभरातील लोकांना त्यांच्या निधनाचे दु:ख झाले. त्यांचे योगदान अतुलनीय आहे. आजही जेव्हा या शोचे निर्माते असित मोदी तारक मेहता शोची चर्चा करतात, तेव्हा ते त्यांचे नाव नक्कीच घेतात. कारण, त्यांनी हा शो तयार केला नसता, तर आज हा शो प्रेक्षकांमध्ये इतका लोकप्रिय झाला नसता.

तारक मेहता यांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हता, तर त्यांचे पार्थिव दान करण्यात आले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ही त्यांची शेवटची इच्छा होती. ते कायम म्हणायचे की, ‘जेव्हा ते मरण पावतील, तेव्हा त्याचे शरीर दान करा, जणेकरून समाजकल्याणात त्यांचा सहभाग नाेंदवू शकतील.’ आज त्यांच्या अनुपस्थितीनंतरही देश त्यांची आठवण काढत आहेत.(tarak mehta death anniversary known unknown facts about his life and show tmkoc)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जान्हवी विमानतळावर ‘बाॅयफ्रेंड’साेबत झाली स्पाॅट, पॅपराझींची नजर पडताच लाजली अभिनेत्री

चिंताजनक! देबिना बॅनर्जीची प्रकृती खालावली, अभिनेत्रीला झाली ‘या’ विषाणूची लागण

हे देखील वाचा