Friday, July 5, 2024

TMKOC | ‘बापूजीं’ना त्यांच्या भूमिकेमुळे झाली होती ‘ही’ गंभीर समस्या, डॉक्टरांनी दिल्या होत्या कडक सुचना

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. टेलिव्हिजवर सर्वात जास्त पाहिली जाणारी आणि दीर्घकाळ चाललेली मालिका अशी या कार्यक्रमाची ओळख आहे. लहान मोठा सर्वच प्रकारच्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाने वेड लावले आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकत असतो. मात्र सगळ्यात जास्त चर्चा होते, ती कार्यक्रमात बापूंजींची भूमिका साकारणाऱ्या अमित भट्ट यांची. मात्र ही भूमिका साकारण्यासाठी अमित भट्ट (Amit Bhatt) यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ कार्यक्रमाची आणि त्यामधील दमदार कलाकारांची नेहमीच चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आहे. परंतु कार्यक्रमात जेठालालनंतर सगळ्यात जास्त चर्चा बापुजींची म्हणजेच अमित भट्ट यांची होत असते. त्यांची आणि जेठालालची जुगलबंदी पाहणे प्रेक्षकांसाठी नेहमीच पर्वणी असते. आपल्या भूमिकेत जिवंतपणा आणण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. मात्र या कार्यक्रमातील भूमिकेमुळे त्यांना मोठी किंमत मोजावी लागली आहे.

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ कार्यक्रमातील बापूजींच्या भूमिकेसाठी निर्मात्यांना वृद्ध व्यक्ती हवी होती. त्यासाठी त्यांनी अमित भट्ट यांचे टक्कल पडले आहे, असे दाखवायचे होते. त्यासाठी अमित भट्ट यांनी कोणत्याही मेकअपचा आधार न घेता थेट शेव करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांना चार पाच दिवसातून शेव करावे लागत होते. अशा प्रकारे सतत शेव केल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. इतकेच नव्हे, तर त्यांना अनेक त्वचेच्या समस्याही झाल्या होत्या. त्यांच्या आजाराचे गांभीर्य पाहून डॉक्टरांनी त्यांना शेव न करण्याचा सल्ला होता, ज्यानंतर ते विग वापरू लागले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा