Friday, July 5, 2024

दिशा वाकाणीचा नवीन फोटो व्हायरल, फॅन्सने शोमध्ये परतण्याची केली विनंती

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील कलाकारांची लोकप्रियता आणि त्यांची फॅन्समधील क्रेझ याबाबत तर सर्वानाच माहिती आहे. टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उलटा चश्मा. मागील १३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आज इतक्या वर्षांनी देखील या मालिकेची प्रेक्षकांमधील क्रेझ यत्किंचितही कमी झालेली नाही. याउलट मालिकेबद्दलचे त्यांचे प्रेम अधिक वाढत आहे.

या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर तर गाठले सोबतच मालिकेने प्रत्येक कलाकाराला देखील स्वतःची एक वेगळी ओळख आणि प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेतील सर्वात लोकप्रिय पात्र म्हणजे दयाबेन. मालिकेत दयाबेन आणि जेठालाल यांची जोडी फॅन्सचे पुरेपूर मनोरंजन करण्याची. त्यांच्या होणारी मजेदार नोकझोक सर्वानाच खूप भावली. मात्र मागील काही वर्षांपासून दयाबेन अर्थात दिशा वाकाणी या मालिकेतून गायब झाली आहे. दिशाने ती प्रेग्नेंट असल्यामुळे मालिकेतून काही दिवसांचा ब्रेक घेतला होता, मात्र आता अनेक वर्षे झाले तरी दिशा मालिकेत परतली नाही. अनेकदा ती पुन्हा मालिकेत दिसण्याच्या बऱ्याच अफवा देखील उठल्या होत्या.

नुकताच दिशाचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये दिशा च्या कडेवर एक बाळ देखील दिसत आहे. हा फोटो नक्की केव्हाचा ते नक्की सांगता येणार नाही, मात्र यात ती विनामेकअप दिसत असून, तिचे केस मोकळे आहे. हा फोटो व्हायरल होत असताना तिचे फॅन्स यावर कमेंट्स करून दिशाला पुन्हा मालिकेत परतण्याची विनंती करत आहे. एका फॅन लिहिले, “मॅम प्लिज एकदा सांगा तुम्ही मालिकेत पुन्हा येणार की नाही, त्यावरून आम्हाला तुमची परिस्थिती समजेल. दुसऱ्या एका फॅनने लिहिले, “मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, प्लिज तुम्ही शोमध्ये परत या.”

दिशाने २०१६ साली मयूर पारिखसोबत लग्न केले त्यानंतर तिने २०१७ साली एका मुलीला जन्म दिला आणि ती मालिकेपासून लांब गेली. सध्या शोमध्ये देखील दया तिच्या आईसोबत तीर्थयात्रेला गेली असल्याचे दाखवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा