टेलिव्हिजन जगतात अनेक लोकप्रिय मालिका आहेत. या मालिकांमध्ये ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने नेहमीच तिचे वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या 12 वर्षांपासून मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या मालिकेतील कलाकार आणि त्यांची भूमिका. मालिकेत असणाऱ्या प्रत्येक पात्राची एक वेगळीच खासियत आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिकेने दर्शकांना आपलेसे केले आहे. मागील काही दिवसांपासून या शोमधील मुख्य भूमिकेत असणारे जेठालाल आणि टप्पू यांच्यातील वादाच्या बातम्या समोर येत आहेत. या आधी जेव्हा दिलीप कुमार यांना या बाबतीत विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, या सगळ्या अफवा आहे. परंतु आता जेव्हा राजला या बाबतीत विचारले, तेव्हा त्याने काय उत्तर दिले जाणून घेऊया…
राजने स्पॉट बॉयला सांगितले की, “मी अशा अफवांवर लक्ष देत नाही. मी फक्त या गोष्टीवर फोकस करतो की, मी चांगला अभिनय करेल, जेणे करून प्रेक्षकांना मी आवडेल. लोकांचं काय ते अशा अफवा पसरवत असतात. परंतु आपण हसून या गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे.”
अशा बातम्या जेव्हा येत होत्या, तेव्हा राज सेटवर उशिरा आला होता. त्यामुळे जेठालालला त्याची अनेक तास वाट पाहावी लागली होती. त्यामुळे दोघांमध्ये जरा वाद झाला. पण जेव्हा दोघांनी या बातम्यांना चुकीचे म्हटले, तेव्हा मात्र त्यांचे चाहते खूप खुश झाले.
याआधी देखील जेठालाल आणि तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा यांच्यात वाद झाले असल्याची बातमी समोर आली होती. ते दोघे सेटवर देखील एकमेकांशी बोलत नसल्याची माहिती समोर आली होती.
शैलेश लोढा यांनी ही बातमी खोटी असल्याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की, या शोमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यात देखील त्यांची आणि जेठालालची खूप चांगली मैत्री आहे. त्या दोघांमध्ये काहीही बिनसले नसल्याची माहिती त्यांनी दिली. शैलेश यांनी सांगितले की, “या अशा बातम्या ऐकून खूप हसायला येते. मला समजत नाही की, अशा खोट्या बातम्या कोण पसरवत.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…