टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चश्मा’. या शोने लोकप्रियतेचा इतिहास रचला आणि नवनवीन रेकॉर्ड बनवले. प्रेक्षकांचे टेन्शन विसरून त्यांना खळखळून हसवणाऱ्या या शोबद्दल मागील काही दिवसांपवून सतत वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या समोर येत आहे. अनेक कलाकारांनी शोला रामराम ठोकल्यानंतर आता अजून एक शो संदर्भात नकारात्मक बातमी समोर येत आहे. तब्बल १५ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करणारा हा शो लोकांच्या आवडीचा टॉपचा शो आहे. मात्र सध्या तो सतत वादांमध्ये येत आहे.
काही महिन्यांपूर्वीच शोमध्ये ‘तारक मेहता’ ही भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी शोला रामराम केला. मात्र आता एक नवीन वाद समोर आला आहे. अभिनेते शैलेश लोढा यांनी अचानक मालिका सोडली. त्यानंतर लोकांनी आणि मीडियाने त्यांनी मालिका का सोडली असावी यामागे असणाऱ्या विविध कारणांची यादीच समोर ठेवली. कोणी सांगितले की, निर्मात्यांसोबत वाद झाल्यामुळे त्यांनी शो सोडला, कोणी सांगितले नवीन शो साठी त्यांनी हा शो सोडला. मात्र आता एक धक्कादायक कारण समोर आले आहे. ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांनी अजूनपर्यंत शैलेश लोढा यांचे बाकी असलेले मानधन दिले नाही. आता तर शैलेश लोढा यांना शो सोडून सहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार शैलेश लोढा यांनी निर्मात्यांसोबत असलेल्या भांडणामुळे हा शो सोडला होता. शैलेश लोढा शोमध्ये स्वतःला अपमानित समजू लागले होते, यासाठीच त्यांनी कोणतीही नोटीस न देता हा शो सोडला. हे पहिल्यांदा नाही झाले की, निर्मात्यांकडून कोणाचे पेमेन्ट उशिरा झाले आहे. प्राप्त माहितीनुसार शो सोडल्यानंतर शोमध्ये ‘अंजली’ ही भूमिका साकारणाऱ्या नेहा यांना देखील पैसे दिले गेले नाही.
तत्पूर्वी शैलेश लोढा अजूनही त्यांना त्यांचे पैसे मिळावे याची वाट बघत आहे. मात्र निर्माते असित मोदी याकडे दुर्लक्ष करत आहे. एप्रिल २०२२ मध्ये त्यांनी शो सोडला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘प्रेम स्वाभाविक नाही’, म्हणत नागराज मंजुळे यांनी सांगितला त्यांच्या पहिल्या प्रेमाचा भन्नाट किस्सा
पार्टीतून बाहेर येताच पॅपराझींना पाहून लाजली जान्हवी; पाहा कोण व्यक्ती होता अभिनेत्रीसोबत