Monday, July 1, 2024

‘एक महिन्यापासून घरीच बसून आहे’, ‘तारक मेेहता का उल्टा चष्मा’तील नट्टू काकांनी मांडली आपली व्यथा

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत आहे. रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या देखील वाढत आहे. महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय सुविधांचा देखील तुटवडा पडत आहे. त्यामुळे प्रशासनाला लोकांना वाचवायचे कसे हा मोठा प्रश्न पडला आहे. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लॉकडाऊनचा सामान्य माणसांसोबतच मालिकांच्या आणि चित्रपटांच्या शूटिंगवर देखील परिणाम झाला आहे. छोट्या कलाकारांकडे या दिवसात काम नाही, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात पैशाची खूपच चणचण भासत आहे. असेच काहीसे घडले आहे, ‘तारका मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील ‘नट्टू काका’ म्हणजेच घनश्याम नायक यांच्यासोबत.

कोरोनामुळे सगळी जनता आज घरात बसून आहे. यातच अनेक जणांचे काम गेले आहे. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील नट्टू काका देखील घरातच बसून आहे. मालिकेची शूटिंग सध्या बंद असल्याने त्यांना घरातच बसावे लागत आहे. त्यांनी टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना आपली व्यथा माडली आहे. ते म्हणाले की, ‘जवळपास एक महिना झाला आहे, मी घरातच बसून आहे.’

घनश्याम नायक यांनी सांगितले की, “कोरोनामुळे सगळी शूटिंग सध्या बंद आहे. यानंतर शूटिंग कधी चालू होणार आहे. तसेच यासाठी त्यांना बोलवले जाईल की नाही, याबाबत काहीच माहिती नाहीये.” पुढे घनश्याम यांनी सांगितले की, “मी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात शूटिंग केली आहे. तेव्हापासून मी घरीच आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी शूटिंगची जागा बदलण्याबाबत देखील काहीच माहिती दिली नाहीये.”

“वय जास्त झाल्याने आता घरच्यांना काळजी वाटत आहे. त्यामुळे घरच्यांनी मला घराच्या बाहेर जाऊ नका, असे सांगितले आहे. परंतु माझी सेटवर परत यायची खूप इच्छा आहे,” असेही त्यांनी पुढे म्हटले.

महाराष्ट्रात लॉकडाऊन होण्याआधी बातमी आली होती की, या मालिकेत गोलीचे पात्र निभावणारे‌ कुश शाह हा कोरोना बाधित होता. पण आता तोही एकदम ठीक असल्याची बातमी आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री हिना खानने घेतला मोठा निर्णय, पोस्ट शेअर करत स्वत: दिली माहिती

-‘ऑल टाईम फेव्हरेट’, अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या ऍनिमल प्रिंटेड ड्रेसमधील फोटोवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

-‘पंगा क्वीन’ कंगना रणौतने तापसी पन्नूवर केलेल्या कमेंटवर भडकले चाहते, म्हणाले…

हे देखील वाचा