Friday, July 5, 2024

दु:खद!! टारझन फेम अभिनेता जो लाराचा विमान अपघातात मृत्यू, पत्नीसह आणखी ६ जणांनी गमावले प्राण

आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अमेरिकन अभिनेता म्हणजे जो लारा. 90 च्या दशकात त्याच्या टार्झन या पात्राने तर सर्वांना अक्षरशः वेड लावले होते. आजही त्याचे चाहते त्याच्या अभिनयाचे कौतुक करत असतात. पण आज त्याच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. सर्वांचा लाडका अभिनेता जो लारा याचे विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

यूएसमधील विमान अपघातात टार्झन फेम अभिनेता जो लारासह सात लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. या अपघातात लाराच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला आहे. आरसीएफआर यांनी त्यांच्या फेसबुकवरून ही माहिती दिली आहे. काउंटी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, इतर सात लोकांची ओळख पटली आहे. यामध्ये ब्रॅंडनहन्ना, ग्वेन एस लारा, विलीअम जे लारा, डेविड एल मार्टिन, जेनिफर जे मार्टिन, जेसिका वॉल्टर्स, जॉनथन वॉल्टर्स यांचा समावेश आहे. हे सगळे टेनेसी ब्रेटवूडचे रहिवासी आहे. त्यांच्या परिवाराकडूनच ही ओळख पटली आहे. या विमानाने शनिवार दुपारी 11 वाजता उड्डाण घेतले होते. या विमानाचा अपघात झाला आणि हे विमान प्रिस्ट नदीत कोसळले आहे. घटनास्थळी राष्ट्रीय परिवहन सेवा बोर्ड आणि एफएए हे दोघेही उपस्थित होते.

लाराने 1989 मध्ये टेलिव्हिजन वरील ‘टार्झन इन मॅनहट्टन’ मध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. या नंतर त्याने टीव्ही सीरिज ‘टार्झन: द एपिक एडवेंचर्स’ मध्ये देखील उत्कृष्ट अभिनय केला आहे. ही सीरिज 1996- 1997 दरम्यान चालली होती. यामधील लाराच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

संगीत क्षेत्रात आपले नाव कमावण्यासाठी लाराने 2002 मध्ये 20 वर्षांनी अभिनय क्षेत्र सोडून दिले. ही ती वेळ जेव्हा जेव्हा लाराचे करिअर चांगले चालले होते. त्याला अनेक चित्रपटात काम मिळत होते. तो त्या वेळेला प्रसिद्धीच्या झोतात होता. ऍक्शन चित्रपटात आर्मस्ट्राँग आणि वारहेड ही पात्र अजूनही प्रसिद्ध आहे. लाराने त्याच्या आयुष्यात दोन वेळा लग्न केले आहे.

हे देखील वाचा