प्रसिद्ध गायिका शकीराचे (shakira) चाहते जगभरात आहेत. तिचा डान्स आणि मूव्ह्सवर सगळ्यांचेच मन फुलून जाते. ‘हिप्स डोंट लाइ’ या गाण्याने ती रातोरात प्रसिद्ध झाली होती. शकिराच्या धमाकेदार गाण्याचे चाहते जगभर पसरले आहेत. आता तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या बातमीनुसार स्पॅनिश वकिलाने कर फसवणूक प्रकरणात गायिका शकिराला आठ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा देण्याची मागणी केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
शकिरा ही कोलंबियाची लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. शकीराच्या जादूई आवाजाचे चाहते जगभर पसरले आहेत. परंतु सध्या गायिका शकिराच्या अडचणी वाढताना दिसत असून तिच्यावर आठ वर्षाच्या शिक्षेची मागणी केली आहे. रॉयटर्स न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार, स्पॅनिश वकिलांनी कोलंबियन सुपरस्टार शकीराला कर फसवणूक प्रकरणात आठ वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची मागणी केली आहे. 2012 ते 2014 दरम्यान कमावलेल्या उत्पन्नावर 14.5 दशलक्ष युरो कर न भरल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे ११७ कोटी रुपये असेल. याच प्रकरणात फिर्यादीने 23 दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे 186 कोटी रुपयांच्या दंडाची मागणी केली आहे.
या आठवड्यात शकीराने फसवणूक प्रकरण बंद करण्यासाठी फिर्यादी कार्यालयाकडून आलेली मांडवलीची ऑफर नाकारली. कारण 2012 ते 2014 दरम्यान ती स्पेनमध्ये राहिली नसल्याचे तिचे म्हणणे आहे. तसेच या प्रकरणात ती निर्दोष असल्याचेही तिचे म्हणणे आहे. साल 2018 मध्ये शकीराचे करचोरी प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात, 2019 मध्ये ती प्रथमच न्यायालयात हजर झाली होती. आपल्याकडून कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले होते की, “शकिराने कर भरण्याच्या वचनबद्धतेचे पालन केले नसल्याचे पुरेसे पुरावे आहेत.”
दरम्यान, शकीराचा जन्म 2 फेब्रुवारी 1977 रोजी कोलंबियातील बॅरनक्विला येथे झाला. FIFA विश्वचषक 2010 साठी तिने ‘वाका वाका – इट्स टाइम फॉर आफ्रिका’ हे थीम सॉन्ग गायले, जे खूप गाजले. या गाण्यानंतर शकिरा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. कोलंबियाच्या इतिहासात शकीराने सर्वाधिक (14 दशलक्ष) संगीत अल्बम विकले आहेत. शकीराने दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत आणि पाच वेळा या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
हेही वाचा –
करवा चौथवर केलेल्या वक्तव्यावरून ट्रोल होतायेत रत्ना पाठक शाह; महिला म्हणाल्या, ‘लज्जास्पद विचार’
‘बरोबर एक वर्षापूर्वी…’ परीच्या ‘त्या’ खास पोस्टची सोशल मीडियावर रंगली चर्चा
धक्कादायक! मुंबईतील सिनेमा सेटला लागली भीषण आग, दूरवर पसरले धुरांचे लोट