Tuesday, March 5, 2024

टेलर स्वीफ्टच्या अस्लील फोटोंमुळे अमेरिकी संसदेत गोंधळ, डीपफेक एआय विरोधात कायद्याची मागणी

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स(Artificial Intelligence) म्हणजेच AI जितकं फायद्याचं ठरतंय तितकंच नुकसानीचंसुद्धा ठरत आहे. AI बाजारात आल्यापासुन डीपफेकचं(Deepfake) प्रमाणही प्रचंड वाढत आहे. बाॅलिवूडपासुन हाॅलिवूडपर्यंतच्या अभिनेत्री ज्याची शिकार बनत आहेत.नुकतेच हाॅलिवूडची सिंगर टेलर स्वीफ्टचा डिपफेक फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे. टेलर स्वीफ्टच्या या डीपफेक फोटोजमुळे अमेरीकेत खळबळ उडाली आहे. तिथले नेतेही डीपफेक विरोधात कायदा व्हायला हवा अशी मागणी करत आहेत. व्हाईट हाऊसने देखील याविरोधात आवाज उठवला आहे. अमेरिकी संसद काँग्रेसचे नेतेही कायद्याची मागणी करत आहेत.

तसं तर वर्षानुवर्षे अनेक अभिनेत्री डीपफेक फोटो आणि वीडियोजच्या शिकार बनत आहेत. परंतु रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna)च्या डीपफेक वीडियोनंतर हा मुद्दा समोर आला. रश्मिकाने याविषयावर स्वतःचा स्टँड घेतला आणि आरोपीच्या विरोधात केस नोंदवुन, आरोपीला अटकही झाली. आता हाॅलिवूडची सुप्रसिद्ध सिंगर टेलर स्विफ्ट (Taylor Swift) याची शिकार बनली आहे.

‘लवर’ सिंगर टेलर स्विफ्ट डीपफेकची शिकार बनली आहे.नुकतेच टेलर स्विफ्टचे अश्लील फोटो सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म एक्स (आधीचे ट्विटर)वर पोस्ट केला गेला. ती पोस्ट अगदी पाण्यावर तेल पसरावं तशी वायरल झाली. यावर टोलरला सपोरेट करत तिच्या चाहत्यांनी आवाज उठवला आहे. तिचे हे फोटो सोशल मिडियावरुन डिलिट केले जोवेत अशी मागणीही तिच्या चाहत्यांनी केली. त्यानंतर एक्सच्या टीमने यावर ऍक्शन घेत टेलरचे सगळे अश्लील फोटो डिलिट केले.

जरी सोशल मिडियावरुन टेलर स्विफ्टचे अश्लील फोटो काढुन टोकले असतील तरी हा वाद अजुन थांबला नाही. फक्त इंटरनेटच नाही तर अमेरिकी संसदेत देखील टेलरच्या या डीपफेक फोटोंवर चर्चा सुरु आहे. अमेरिकेचे नेते टेलर स्विफ्टला सपोर्ट करत या टेक्नीकच्या विरोधात कायदा बनवण्याची मागणी करत आहेत.

एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, व्हाइट हाउसची स्पोकपर्सन जीन -पियरे(Karine Jean-Pierre)ने देखील डीपफेक टेक्निक विरोधात कायदा तयार करण्याची मागणी केली आहे. कैरिन म्हणाल्या,” ते फोटो वायरल झाल्याच्या रिपोर्टमुळे मला काळजी वाटत आहे. ही खुप चिंताजनक बाब आहे.” त्या पुढे असंही म्हणाल्या की,”सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मला आपत्तिजनक फोटो आणि चुकीच्या सिचनांपासुन वाचण्यासाठी कडक नियम लागु करायला हवेत. ” यासोबतंच अमेरिकेच्या प्रतिनिधी जो मोरेल यांनी टेलर स्विफ्ट च्या अश्लील फोटो वायरल होणं भयानक आहे.असं सांगितलं.

हे देखील वाचा