Wednesday, July 3, 2024

“सध्याची परिस्थिती बघता मी…” स्क्रीन मिळत नसलेल्या टीडीएम सिनेमा संदर्भात दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचा मोठा निर्णय

चित्रपटगृहांमध्ये मराठी सिनेमांना स्क्रिन न मिळणे हा काही नवीन मुद्दा नाही. बऱ्याच मोठ्या काळापासून हा मुद्दा सतत गाजत आहे. मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळावी यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी देखील हस्तक्षेप केला, मात्र तेवढ्यापुरता फरक पडला तर पडला पण प्रश्न मात्र सुटत नाही. आता पुन्हा एकदा एका मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्यामुळे मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे यांच्या टीडीएम सिनेमाला स्क्रीन भेटत नसल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. मागच्या दोन तीन दिवसांपासून हा मुद्दा आणि सिनेमा या कारणामुळे तुफान गाजत आहे. मात्र आता सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या भाऊराव कऱ्हाडे यांनी एक निर्णय घेतला आहे.

भाऊराव यांनी त्यांचा निर्णय त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सगळ्यांना सांगितला आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भाऊराव यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यात त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “माझ्या टीडीए सिनेमाचे होणारे सर्व शो आम्ही मागे घेत आहोत.’ सिनेमाच्या निर्मात्यांनी एक प्रसिद्धीपत्रकही जाहीर केले असून ते त्यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केले आहे. पत्रकात लिहिले आहे की, ‘रसिक प्रेक्षकहो नमस्कार, मला माहिती आहे तुम्हाला ‘टीडीएम’ सिनेमा थिएटरमध्ये बघायची इच्छा आहे. पण सध्याची परिस्थिती बघता मी ‘टीडीएम’चे प्रदर्शन तूर्तास थांबवत आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढील प्रदर्शनाचे अपडेट्स लवकरात लवकर देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तुम्ही करत असलेल्या सहकार्यासाठी सर्वांचे मन:पूर्वक आभार ! आपलाच ,
भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आणि टीडीएम परिवार.”

दरम्यान भाऊराव कऱ्हाडे यांनी ख्वाडा, बबन अशा अस्सल गावाकडच्या चित्रपटांमधून वेगळे विषय प्रेक्षकांसमोर मांडले आणि आपली ओळख निर्माण केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला टीडीएम सिनेमा २८ एप्रिला प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. परंतु त्यानंतर या सिनेमाला स्क्रिन मिळत नसल्याचे वास्तव समोर आले. हा सिनेमा पाहता येत नसल्यानं प्रेक्षकांची घोर निराशा झाली आहे. सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक भाऊराव तसंच अन्य कलाकारांनी यासंदर्भात खंत व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी देखील या संदर्भात ट्विट केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

विकिपीडिया मावशींची ‘ही’ चूक ठरली जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यासाठी डोकेदुखी

“सलमानसाठी सर्वात सुरक्षित जागा…” सलमान खानच्या सुरक्षेवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

हे देखील वाचा