Monday, January 26, 2026
Home टेलिव्हिजन ‘लाफ्टर शेफ्स’ सीझन 3 वर टीम कांटाचे वर्चस्व, ट्रॉफी जिंकत जल्लोष केला साजरा

‘लाफ्टर शेफ्स’ सीझन 3 वर टीम कांटाचे वर्चस्व, ट्रॉफी जिंकत जल्लोष केला साजरा

लोकप्रिय कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो ‘लाफ्टर शेफ्स’चा तिसरा सीझन रविवारी संपला असून, टीम कांटाने विजेतेपद पटकावले आहे. रविवारी प्रसारित झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये रंगतदार आणि मनोरंजक लढतीनंतर टीम कांटाने टीम छुरीचा पराभव करत या सीझनचा संस्मरणीय शेवट केला.

टीम कांटामध्ये कृष्णा अभिषेक, कश्मीरा शाह, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, अली गोनी आणि जन्नत जुबैर यांचा समावेश होता. संपूर्ण सीझनभर या टीमने कॉमेडी, धमाल आणि भरपूर मनोरंजनाची मेजवानी देत प्रेक्षकांची मने जिंकली आणि अखेर विजेतेपदावर आपले नाव कोरले.

टीम छुरीमध्ये एल्विश यादव, करण कुंद्रा, (Karan Kundrra)तेजस्वी प्रकाश, विवियन डीसेना, ईशा सिंह, गुरमीत चौधरी, देबिना बॅनर्जी आणि ईशा मालविया हे सदस्य होते. त्यांनीही जबरदस्त स्पर्धा दिली आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांची पसंती मिळवली, मात्र अंतिम फेरीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

ग्रँड फिनालेचे प्रक्षेपण कलर्स टीव्हीवर करण्यात आले, तर जिओ हॉटस्टारवर रात्री 9 वाजता हा भाग स्ट्रीम करण्यात आला. विशेष म्हणजे, भारती सिंगने आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर ग्रँड फिनालेच्या निमित्ताने शोमध्ये पुनरागमन केले. त्यांनी 19 डिसेंबर रोजी बाळाला जन्म दिला होता आणि काही काळ मातृत्व रजेवर होत्या.

टीम कांटाने जिंकलेल्या रोख बक्षिसाची अधिकृत रक्कम अद्याप कलर्स टीव्हीकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार विजेत्या टीमला साधारणतः काही लाख रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाते, मात्र अंतिम आकडा स्पष्ट झालेला नाही.

हा कॉमेडी रिअ‍ॅलिटी शो टीव्ही विश्वात चांगलाच गाजला. मागील काही महिन्यांपासून शोची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली असून प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिले. टीआरपीच्या बाबतीतही ‘लाफ्टर शेफ्स’ने दमदार कामगिरी केली, अनेक आठवडे हा शो टीआरपी यादीतील टॉप 5 मध्ये कायम राहिला.

पहिल्या सीझनपासून ते तिसऱ्या सीझनपर्यंत या शोने प्रेक्षकांना मनसोक्त हसवले. आता रविवारी हा शो संपला असला, तरी त्याचे भाग जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

धर्मेंद्र यांना पद्म विभूषण मिळताच हेमा मालिनी भावुक, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा