Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड बहुचर्चित मेजर चित्रपटाचा टीजर प्रदर्शित, प्रेक्षकांना लागलीय चित्रपटाची आस

बहुचर्चित मेजर चित्रपटाचा टीजर प्रदर्शित, प्रेक्षकांना लागलीय चित्रपटाची आस

बहुचर्चित ‘मेजर’ या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची सर्वत्र खूप चर्चा पसरली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे, अशी सर्वत्र चर्चा सुरू होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. शशी किरण टिक्का यांच्या या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २६/१२ च्या हल्यावर आधारित आहे. या चित्रपटात अदिवी शेष आणि सई मांजरेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा टीजर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार महेश बाबू याने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. हा टीजर शेअर करून त्यांनी लिहिले आहे की, “भारतातील जवानांच्या कार्याचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली. तुम्हा सगळ्यांना हा टीजर आवडले हीच अपेक्षा.”

मेजर या चित्रपटात अदिवी शेष हा २६/१२ हल्यातील शहीद जवान संदीप उन्नकृष्णन यांची भूमिका निभावणार आहे. टीजर मधील त्यांची भूमिका पाहून असे वाटत आहे की, त्याने संदीप उन्नीकृष्णन यांचे कार्य हुबेहूब पडद्यावर मांडले आहे. या चित्रपटात प्रकाश राज, रेवती, मुरली शर्मा यांसारखे अनेक कलाकार दिसणार आहे. सलमान खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनी या चित्रपटाचा टीजर हिंदी आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित केला आहे. प्रेक्षकांचा या टीजरला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सगळ्या दर्शकांना आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आस लागली आहे. सगळेजण हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे. याची विचारणा करत आहे.

 

मेजर हा चित्रपट‌ तेलगू, मल्याळम, आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे तेलगू डायलॉग अब्बुरी रवी यांनी लिहिले आहे. अक्षत अजय शर्मा यांनी हिंदी डायलॉग लिहिले आहेत. तसेच श्रीचरन पकला यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट 2 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होण्याची माहिती आली आहे.

हे देखील वाचा