Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

मनाला स्पर्श करणारा ’कशा असतात ह्या बायका’! नावाचा लघुपट प्रदर्शित, तेजश्री, अभिजित, मयूरचा हृदयस्पर्शी अभिनय

चित्रपट, मालिका, जाहिराती आदी सर्वच माध्यमे आपल्या मनोरंजनासाठी कार्यरत असतात. ही माध्यमे फक्त आपले मनोरंजन करतात असे नाही, तर मनोरंजनासोबतच समाज प्रबोधन, उत्तम शिकवण, विशिष्ट जाणीव करून देण्याचे देखील काम करतात. मागील काही वर्षांपासून या माध्यमातून मनोरंजनासोबत सामाजिक प्रबोधनाचे काम देखील वाढले आहे. आपल्या महत्वाच्या आणि मोठ्या सणांना अनुसरून वेगवेगळे ब्रँड त्यांच्या जाहिराती काढतात. आपली जाहिरात इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक असावी हा प्रयत्न सर्वच करतात.

दिवाळी आपल्या देशातील सर्वात मोठा सण. तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा संदेश देणारी दिवाळी सर्वानाच आवडते. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी सर्वत्र लगबग सुरु आहे. यातच मनोरंजन विषयातून एक लघुपटू समोर आला आला आहे. खरंतर ही एक जाहिरात असून, यातून एक उत्तम संदेश देण्यात आला आहे. तेजश्री प्रधान. अभिजित खांडकेकर आणि मयूर मोरे यांची ही जाहिरात सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे.

‘कशा असतात ह्या बायका’ असे नाव असलेला हा लघुपट कुटुंब, घर आणि करिअर सांभाळणाऱ्या सर्व महिलांना समर्पित केला आहे. विशेष म्हणजे, स्त्रियांच्या नाजूक आणि महत्वाच्या विषयाला हात घालणारा हा लघुपट ’कॉटन किंग’ या पुरुषांचा ब्रॅंडने केला आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून या टीमने स्त्रियांना त्यांच्या हक्काचा सन्मान मिळवून दिला आहे.

नेहमीच भावाला बहिणीचा रक्षणकर्ता म्हणून सांगितले जाते. लहान भाऊ असला तर त्याला समजत नाही, लहान आहे म्हणून त्याला नेहमीच कमी लेखले जाते, मात्र हाच लहान भाऊ या लघुपटात मोठा संदेश देऊन जातो. भाऊबीजेच्या खास ओवाळणी या निमित्ताने हा भाऊ त्याच्या बहिणीला देत आहे. यातून मिळणार संदेश हा फक्त या लघुपटातील स्त्रीपुरता नसून, संपूर्ण स्त्रियांनाच अनुसरून दिला असल्याने या लघुपटाचे सर्वच स्तरातून खूप कौतुक केले जात आहे. आपल्या बायकोला नेहमी कमी लेखणाऱ्या आजच्या काळातील नवऱ्याला त्याचा मेहुणा त्याला एक महत्वाची शिकवण देऊन जातो. अदभूत क्रिएटीव्हज निर्मित हा लघुपट दिग्दर्शित केला आहे वैभव पंडित यांनी आणि मोनिका धारणकर यांनी लिहिला लिहिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला

गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

सेटवरील गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे प्रियांका झालीय दुःखी, आपल्या भावना शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा