Wednesday, July 3, 2024

‘बिग बॉस १५’ ला मिळाली विजेती स्पर्धक, ट्रॉफीवर कोरले तेजस्वी प्रकाशचे नाव

‘बिग बॉस १५’ने यावर्षी प्रेक्षकांना अगदी खिळवून ठेवले होते. गेले ४ महिना हा शो चालू होता. शेवटी या पर्वाचा विजेता कोण होईल याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. अशातच बिग बॉसच्या १५ व्या पर्वाची विजेती स्पर्धक मिळाली आहे. तेजस्वी प्रकाशने या शोमध्ये विजयाचा झेंडा रोवून या पर्वाची ट्रॉफी तिच्या नावी केली आहे.

शेवटी घरात प्रतीक सहजपाल (pratik shehjpak) आणि तेजस्वी प्रकाश (tejasswi prakash) हे दोन स्पर्धक राहिले होते. त्या दोघांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. परंतु शेवटी या शोचा होस्ट सलमान खानने तेजस्वी प्रकाशचे या पर्वाची विजेती म्हणून नाव घोषित केले. तिच्या विजयाने सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे.

बिग बॉसच्या घरात असताना तिच्या आणि करण कुंद्राच्या प्रेमाच्या खूप चर्चा चालल्या होत्या. त्यांनी टेलिव्हिजनवर सगळ्यांसमोर त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला होता. तसेच त्यांच्या घरच्यांनी देखील त्यांच्या या नात्याला हिरवा कंदील दाखवला होता. ‘बिग बॉस १५’ च्या फिनालेमध्ये तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, शमिता शेट्टी, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल हे स्पर्धक होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा