Sunday, July 14, 2024

बिग बॉस विनर तेजस्वी प्रकाशने पाडवाच्या मुहूर्तावर खरेदी केली एक कोटीची आलिशान गाडी

हिंदी चित्रपट आणि मनोरंजन जगतात एकदा यशस्वी झाले की या क्षेत्रातल्या कलाकारांचे आयुष्य पुर्णपणे बदलून जाते. सध्या बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री तेजस्वी प्रकाशही (Tejasswi Prakash)  लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याचे दिसून येत आहे. तेजस्वीने फक्त ‘बिग बॉस १५’ चा किताबचा जिंकला नाही तर आता अनेक मालिकांच्या संंधी तिच्याकडे येत आहेत. सध्या ती एकता कपूरच्या नागीण कार्यक्रमात प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. आता ही भूमिका लोकप्रिय ठरल्यानंतर तेजस्वीने पाडव्याच्या शुभमूहुर्तावर आलिशान गाडी खरेदी केली आहे. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, बिग बॉस विनर तेजस्वी प्रकाशने ऑडी Q7 ही आलिशान कार खरेदी केली आहे ज्याची सध्या चर्चा रंगली आहे. तेजस्वी प्रकाशला गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन कार घ्यायची होती पण 3 दिवसांनी ती व्यस्त असल्याने नवीन कार घरी नेण्यासाठी ती शोरूमवर पोहोचली. त्यावेळी, नवीन कारची डिलिव्हरी घेण्यासाठी ती एकटी नाही, तर तिच्यासोबत करण कुंद्रा होता. सध्या त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू आहे त्यामुळे दोघेही नेहमीच सोबत फिरताना दिसत आहेत. यावेळी गाडी घरी नेण्यापूर्वी तेजस्वीने प्रथेनुसार पूजाही केली. त्यासाठी त्यांनी पंडितजींनाही बोलावले होते. गाडीची पूजा गाडीसमोर नारळ फोडून तेजस्वीने गाडी नेली.

दरम्यान तेजस्वी प्रकाशने जी नवीन आलिशान कार घेतली आहे त्याची किंमत जवळपास 1 कोटी आहे. अनेक बॉलीवूड कलाकारांना या कारचे वेड लागले आहे आणि त्यांनी या कारचा त्यांच्या आलिशान कार कलेक्शनमध्ये समावेश केला आहे. यासोबतच आता तेजस्वी प्रकाशही या यादीत सामील झाली आहे. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी तेजस्वीचे करिअर काही खास करत नव्हते, पण करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांना बिग बॉसमध्ये लॉटरी लागली. या कार्यक्रमात त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले. आता तेजस्वी ही नागिन कार्यक्रमाची मुख्य अभिनेत्री आहे, तर करण कुंद्राकडेही कामांची कमतरता नाही. तो सध्या लॉकअपमध्ये जेलरच्या भूमिकेत दिसत आहे, तर लवकरच तो आणखी एक रियॅलिटी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा