Wednesday, August 6, 2025
Home टेलिव्हिजन करण कुंद्राच्या ट्विटवर उत्तर देताना तेजस्वीने केला त्यांच्या नात्याबद्दल महत्वाचा खुलासा म्हणाली, “मी अंधविश्वासू आहे…’

करण कुंद्राच्या ट्विटवर उत्तर देताना तेजस्वीने केला त्यांच्या नात्याबद्दल महत्वाचा खुलासा म्हणाली, “मी अंधविश्वासू आहे…’

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लव्ह बर्डस म्हणून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची जोडी ओळखली जाते. ते दोघं सतत या ना त्या कारणामुळे मीडियामध्ये गाजताना दिसतात. कधी एकत्र कमी करण्यामुळे, कधी त्यांच्या डेटमुळे, कधी त्यांच्या विविध कार्यक्रमांमुळे त्यांना सोबत स्पॉट केले जाते. बिग बॉस १५ मध्ये भेट झाल्यानंतर आधी मैत्री आणि नंतर हा शो संपेपर्यंत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. शो संपल्यानंतरही त्यांचे प्रेम टिकून होते. नेहमीच हे दोघं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. एकमेकांच्या कुटुंबासोबत सणवार साजरे करतात. सर्व काही आलबेल असताना अचानक करण कुंद्राने एक ट्विट केले आणि त्यातून त्यांच्यात काहीही सुरळीत नसल्याचे सांगितले जाऊ लागले.

करण कुंद्राने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करताना एक शायरी लिहिली होती. त्यात त्याने लिहिले होते की, “ना तेरी शान कम होती है.. ना रुतबा घटा होता.. जो घमंड में कहा..वही हंस के कहा होता है…।” त्याचे हे ट्विट तुफान व्हायरल झाले आणि त्यांचे ब्रेकअप झाल्याचा अंदाज वर्तवला जाऊ लागला. मात्र यानंतर करणने त्याच्यावर कोणतेही मत मांडले नाही.

यानंतर करण आणि तेजस्वी यांच्या ब्रेकअपच्या चर्चाना उधाण आले होते. सोशल मीडिया, मीडिया यात सतत त्यांच्या ब्रेकपबद्दल तिला विचारले जात होते. यामुळे तिने समोर येउन यावर स्पष्टीकरण दिले आहे. तेजस्वीने सांगितले की. “प्रेमाबद्दल बोलण्यापासून मी स्वतःला वाचवत असते. कारण मी याबाबतीत काहीशी अंधविश्वासू आहे. याबद्दल मी जास्त बोली तर कोणाची प्रेमाला नजर लागू शकते. सध्या माझ्या आयुष्यातील खूपच सुंदर फेज चालू आहे. लग्न करणे माझ्यासाठी नक्कीच महत्वाचे आहे. मात्र जोपर्यंत लग्नाचे काही ठरत नाही, किंवा लग्न होत नाही तोपर्यंत मी याबद्दल काहीही बोलू इच्छित नाही.” यावरून हे तर नक्कीच स्पष्ट झाले की त्यांचे ब्रेकअप झालेले नसून त्या फक्त अफवा आहेत. मात्र लवकरच त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहचावे अशीच त्यांच्या सर्व फॅन्सची इच्छा असेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“मला सिगारेट ओढणाऱ्या मुली आवडतात …”, सीमा पाहवा यांचं माेठं वक्तव्य, एकदा वाचाच

मधुचंद्रानंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करणार स्वरा, हळदीच्या रंगात रंगली अभिनेत्री

हे देखील वाचा