Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘हा पुर्णविराम नाही, तर अर्धविराम…’, अभिनेत्री तेजस्वी पंडीतचे चाहत्यांना खास पत्र; जरुर वाचा

नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर करण्याचा सण! हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. सर्वजण हा सण अगदी जल्लोषात साजरा करतात. सर्व सामान्यांप्रमाणे कलाकार मंडळी देखील या सणाला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. अशातच त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. या सर्वांमध्ये लक्षवेधी ठरतं, ते म्हणजे तेजस्विनी पंडितचं फोटोशूट.

अभिनेत्री या दिवसांत वेगवेगळ्या देवींची रूपं साकारते. इतकेच नव्हे, तर या द्वारे ती समाजातील विविध महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य देखील करत असते. महिलांच्या कलागुणांना वाव देणारी आणि त्यांच्या ताकदीला सलाम करणारी तेजस्विनीची ही कौतुकास्पद संकल्पना दरवर्षी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते. यावर्षी देखील चाहते अभिनेत्रीच्या या फोटोशूटची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र यावेळी काही कारणास्तव तेजस्विनी हे फोटोशूट करू शकली नाही. यासाठी तिने दिलगिरी व्यक्त केली आहे आणि यासंबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. (tejaswini pandit apology letter for fans)

पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणतेय, “नमस्कार ! कसे आहात ? सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !! सगळ्यात आधी तुमचे मनापासून आभार आणि माफी सुद्धा !! आभार तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल की गेल्या ३ वर्षांप्रमाणे याही वर्षी मी नवरात्री निमित्त खास फोटो , संदेशांच्या माध्यमाने तुम्हाला भेटायला येईन, आणि माफी यासाठी की ते या वर्षी शक्य झालं नाही. दोन दिवस आधीपासूनच तुमचे असंख्य मेसेजस मला मिळत होते आणि कुठेतरी मनाला सुखावतही होते , आजच्या क्षणार्धात बदलणाऱ्या जगात तुम्ही माझ्या कलाकृतींची नोंद ठेवलीत हा माझा बहुमान आहे.”

पुढे तिने लिहिलं की, “पण तरीही या वर्षी मी कोणतीच संकल्पना साकारली नाही. अर्थात याची अनेक कारणे देखील आहेत आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझा नवनिर्मितीचा ध्यास. माझ्या production house कडून तुमच्यासाठी दर्जेदार कलाकृती घेऊन लवकरच येते आहे आणि Trust me its not at all an easy task. असं म्हणतात कोणतीच गोष्ट half heartedly करू नये, आणि रसिक प्रेक्षकांसाठी तर नाहीच नाही. आणि म्हणूनच या वर्षी जरा थांबण्याचा निर्णय घेतला.
पण लक्षात घ्या हा पूर्ण विराम नाही , अर्ध विराम आहे…आणि अर्धविराम पुढील वाक्याचा अर्थ अजून वाढवतो. तेंव्हा पुढच्या वर्षी अजून दमदार संकल्पने सह तन, मन, धन अर्पून तुमच्या समोर येईन. आणि या वर्षी माझी संकल्पना जरी तुमच्या समोर आली नसली तरी माझ्या अनेक चाहते, अनुयायी, सहरंगकर्मींनी प्रेरणेची ही मशाल पुढे धगधगत ठेवली आहे आणि याचा मला मनापासून आनंद आहे. तेव्हा पुन्हा एकदा आभार आणि माफी पुन्हा एकदा !!! आणि ठाम विश्वास की हो पुढच्या वर्षी नक्कीच भेटू.”

ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहते यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी

हे देखील वाचा