Friday, August 1, 2025
Home अन्य हाय रं…’नथीचा नखरा’, अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या पारंपारिक वेशभूषेतील फोटोला चाहत्यांकडून पसंती; पाहा फोटो

हाय रं…’नथीचा नखरा’, अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या पारंपारिक वेशभूषेतील फोटोला चाहत्यांकडून पसंती; पाहा फोटो

सौंदर्य आणि अभिनय यांच्या सुंदर मिलापाचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी पंडित. तेजस्विनीने तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. तेजस्विनीने आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला.

तेजस्विनीने ‘अगं बाई अरेच्चा’ या तिच्या पहिल्याच सिनेमातून तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक उत्कृष्ट भूमिका निभावल्या. तेजस्विनी चित्रपटांमध्ये जेवढी लोकप्रिय आहे तेवढीच सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे विविध फोटो पोस्ट करत असते.

नुकतेच तिने तिचा एका सुंदर फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. खणाची सुंदर साडी आणि त्यावर तिच्या सौंदर्यात भर घालणारी तिची नथ अतिशय सुंदर दिसत आहे. तिने हा फोटो पोस्ट करताना, ‘नथीचा नखरा’ असे लिहीत पोस्ट केला. पारंपरिक वेशभूषेत ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोला चाहत्यांकडून भरपूर लाइक्स मिळत असून हा फोटो खूप व्हायरल देखील झाला आहे.

तेजस्विनी आणि अभिज्ञा भावे यांनी मिळून ‘तेजाज्ञा’ हा साड्यांचा नवीन ब्रँड देखील सुरु केला आहे. तेजस्विनीने तु हि रे, मी सिंधुताई सपकाळ, ये रे ये रे पैसे, देवा, एक तारा असे सिनेमे तर लज्जा, एकाच या जन्मी जणू, १०० डेज आधी मालिकांमध्ये तिने काम केले. शिवाय तिने मागच्यावर्षी ‘समांतर’ या वेबसिरीजमधून तिने डिजिटल डेब्यू केला.

हे देखील वाचा