Monday, October 27, 2025
Home मराठी अखेर ‘बॅनलिपस्टिक’ प्रकरण उलगडले, तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर सांगितले या मोहिमेमागील खरे कारण

अखेर ‘बॅनलिपस्टिक’ प्रकरण उलगडले, तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर सांगितले या मोहिमेमागील खरे कारण

नुकतेच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सोशल मीडियावर लिपस्टिक पुसताना. एक व्हिडिओ शेअर करून बॅन लिपस्टिक असे सर्वत्र व्हायरल केले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तिच्यासोबत अभिनेत्री सोनाली खरे हिने देखील असाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. नेहमीच वेगवेगळ्या शेडच्या लिपस्टिक लावून फिरणाऱ्या या अभिनेत्री अचानक बॅन लिपस्टिक का म्हणत आहेत. हे कोणालाही समजत नव्हते.

सोशल मीडियावर युजर्स वेगवेगळे अंदाज बांधत होते. अशातच या बॅन लिपस्टिकचे प्रकरण समोर आले आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘अनुराधा’ ही आगामी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्याशीच संबंधित हे ‘बॅन लिपस्टिक’प्रकरण आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही नवीकोरी वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होत आहे. जेव्हा तेजस्विनी आणि सोनालीने हा व्हिडिओ शेअर केला होता त्यावेळी संजय जाधवने या दोघींच्याही व्हिडिओवर काय झाले आहे अशी कमेंट केली. तेव्हाच अनेकांना अंदाज आला होता की, संजय जाधवचा या प्रोजेक्टसोबत काहीतरी संबंध आहे. (Tejaswini pandit share a post about ban lipstick on social media)

लवकरच तेजस्विनीची ‘अनुराधा’ ही वेबसीरिज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तिने या सीरिजचे पोस्टर अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. यासोबत तिने लिहिले आहे की, “सध्या चर्चेत असलेलं #BanLipstick नक्की काय आहे? त्याचंच उत्तर यात दडलंय. ‘अनुराधा’ येतेय… लवकरच फक्त ‘प्लॅनेट मराठी’ अ‍ॅपवर!” त्यामुळे हा तिच्या आगामी वेबसीरिजचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे पोस्टर पाहून तिच्या चाहत्यांना या वेब सीरिज ची उत्सुकता लागली आहे. या वेबसीरिजमध्ये नक्की काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. परंतु नक्की यात काय असणार आहे हे आता आपल्याला येणाऱ्या काळातच समजेल.

हेही नक्की वाचा –

हे देखील वाचा