तेजस्विनी पंडित मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय नामांकित आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. करमणूक उद्योगातील एक मोठे नाव असण्याबरोबरच, ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो आणि बर्याचदा तिचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. ही मराठमोळी अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे इंटरनेटवर बऱ्याचदा चर्चेत येत असते. तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. तिच्या या पोस्ट्सला चाहत्यांकडूनही खूप प्रेम मिळते. त्यामुळे तिचे फोटो बरेच व्हायरल होत असतात.
अलीकडेच तेजस्विनीने शेअर केलेले फोटो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत, जे सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो अभिनेत्रीने तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्रीचा स्टायलिश आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. (tejaswini pandit share her hot stylish photos on social media)
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तेजस्विनीने लाल रंगाचा चेक्सचा शर्ट घातला आहे. तसेच डोक्यावर टोपी आणि पायात मोजे देखील घातले आहेत. मोकळे सोडलेले केस तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत. एकंदरीत अशा लूकमध्ये, अभिनेत्री बेडवर बसून फोटोसाठी पोझ देत आहे.
हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘फेव्हरेट’ असं लिहिलं आहे. शिवाय हा थ्रोबॅक फोटो असल्याचेही तिने सांगितले आहे. तेजस्विनीने शेअर केलेल्या या फोटोवर काही तासांतच २५ हजारहून अधिक लाईक्स आले आहेत. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे.
तेजस्विनीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने केदार शिंदे दिग्दर्शित, ‘अग्गं बाई अरेच्चा’ मध्ये नकारात्मक भूमिका साकारून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ती एका वास्तविक कथेवर आधारित, मी ‘सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटाने तिला बरीच ओळख मिळवून दिली. यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तिने फक्त चित्रपटातच नव्हे, तर टीव्ही शो आणि नाटकांमध्येही काम केले आहे. तेजस्विनी अखेरच्या वेळेस संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत उमेश कामत आणि सिध्दार्थ जाधव मुख्य भूमिकेत दिसले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ कलाकारांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मात्यांकडून घेतले होते बक्कळ पैसे
-किर्तनकार शिवलीला पाटील बिग बाॅस मराठीच्या घराबाहेर? पाहा काय आहे नक्की प्रकरण
-पर्सच्या निमित्ताने पुन्हा रंगला अनुपम खेर आणि त्यांच्या आईमध्ये मजेशीर संवाद