Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

बोल्ड अँड ब्युटीफुल! पाहा मराठमोळ्या तेजस्विनी पंडितचे घायाळ करणारे ग्लॅमरस फोटो

निखळ सौंदर्य आणि मनमोहक हास्य असणारी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. तिने तिच्या अभिनयाने चित्रपट, मालिका, वेबसिरीज, नाटकं अशा सर्वच माध्यमातून तिने रसिकांचे मनोरंजनक केले.

तेजस्विनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते, ती नेहमीच तिचे विविध फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

तेजस्विनीने नुकतेच तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवरून शेयर केले आहेत.

ब्लॅक अँड व्हाईट असलेल्या या फोटोंमध्ये तेजस्विनी अतिशय बोल्ड आणि ब्युटीफुल दिसत आहे.

साडी आणि बॅकलेस ब्लाउजमध्ये तेजस्विनी अतिशय सुंदर दिसत आहे.

अतिशय साधा कमी मेकअप असणारा तिचा हा लुक प्रेक्षकांना घायाळ करत आहे.

तिच्या या फोटोंमधले सर्वात लक्षवेधक ठरले ते ती केसात घातलेले गुलाबाचे फुल.

‘मी सिंधूताई सपकाळ’ हा सिनेमा तिच्या करियर मधला मैलाचा दगड ठरला होता. सोबतच तिने ‘तू ही रे’, ‘देवा’, ‘ये रे ये रे पैसा’ अशा चित्रपटांमध्ये ग्लॅमरस भूमिका देखील उत्तम साकारल्या होत्या.

तेजस्विनीच्या सर्वच फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरभरून लाइक्स आणि कमेंट्स मिळत असतात.

हे देखील वाचा